August 9, 2025

व्यवस्थापन शास्त्र विभागाच्या “विद्यापीठ-उद्योग समिट” कार्यक्रमास उदंड प्रतिसाद

  • धाराशिव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र विभागामार्फत आयोजित “विद्यापीठ-उद्योग समिट 2023” कार्यक्रम दि.१ डिसेंबर 2023 रोजी उपपरिसरात घेण्यात आला. व्यवस्थापन शास्त्र विभागामार्फत उद्योग, व्यवसाय, नोकरी आणि स्किल याच्या उन्नतीसाठी कार्य केले जाते, याचाच एक भाग म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी लघुउद्योग भारती धाराशिवचे अध्यक्ष तथा रोहिणी इंडस्ट्रीचे निशांत होनमुटे,वेणू टाइल्सचे संजय देशमाने,जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एन. पी.जावळीकर,धनशक्ती फिनटेकचे को-फौंडर तुषार बेलवाल,सुप्रसिद्ध निर्यातदार तथा युनिफॉर्म गारमेंट इंडस्ट्रीचे अमित जैन,सिद्धेश्वर गारमेंटचे संचालक आकाश माळगे,विद्यापीठ उप परिसर धाराशिवचे संचालक डॉ. प्रशांत दीक्षित,व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ.सुयोग अमृतराव उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी देशमाने यांनी उद्योगाला आवश्यक असणाऱ्या कला आणि मार्केट मधील असणाऱ्या गरजा याच्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच धाराशिव परिसरातील उद्योग आणि व्यवसायाच्या उपलब्ध संधी उपस्थितांसमोर मांडल्या.अमित जैन यांनी जगभरात असणाऱ्या निर्यातीच्या संधी आणि त्यासाठी शासनाच्या असणाऱ्या विविध योजना यांची माहिती दिली.सदर कार्यक्रमांमध्ये धाराशिव एमआयडीसी मधील नवउद्योजक आणि व्यावसायिक यांचा देखील सत्कार करण्यात आला यामध्ये संन्मती फूडच्या सौ.धनश्री हिंदणे,प्रत्यूष अगरबत्ती यांच्या सौ. कल्याणी केसकर, गया कशी इंडस्ट्री यांचे प्रज्योत बनसोडे, आयुष इंडस्ट्रीचे संजय कुलकर्णी आणि ओम प्लास्टोचे विठ्ठल हूकिरे.यातील काही उद्योजकांनी त्यांच्या उद्योगात असणाऱ्या नाविन्यपूर्ण गोष्टी आणि त्यांची यशोगाथा सदर कार्यक्रमात मांडली. विभागाचे संचालक डॉ. अमृतराव यांनी विभागाचा असणारा आतापर्यंतचा प्रवास मांडला. तसेच उद्योग व्यवसाय वाढीसाठी धाराशिव परिसरात पुढे देखील कार्य आमचा विभाग करत राहील असे संबोधले. उप परिसराचे संचालक तथा कार्यक्रम अध्यक्ष डॉ.दीक्षित यांनी व्यवस्थापन शास्त्र विभागामार्फत होत असणाऱ्या विविध कार्यक्रमांचा उल्लेख आपल्या भाषणात करून विभागाचे कौतुक केले. उद्योगात होत असणारा तंत्रज्ञानामधील बदल आणि शिक्षणात येत असणाऱ्या एन.ई.पी. सारख्या बदलास सामोरे जाण्यासाठी असे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.
    दुसऱ्या भागात सर्वाना आवडीचा ठरलेला “पॅनल डिस्कशन सेशन” घेण्यात आला यामध्ये विभागाचे डॉ. विक्रम शिंदे आणि प्रा. सचिन बस्सैये यांनी मुलाखती द्वारे उपस्थित उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या यामध्ये उद्योजक बनण्यापासूनचा संपूर्ण प्रवास, आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय या मुलाखतीद्वारे सांगण्यात आले. श्री तुषार बेलवाल यांनी आपल्याकडे असणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या उद्योगासाठी कसा करता येईल आणि “झिरो गुंतवणूक उद्योग” देखील चालू होऊ शकतो हे सांगितले. श्री अमित जैन यांनी परदेशात जाऊन जिथे विकास झाला नाही अशा ठिकाणी केलेला अभ्यास आणि संशोधन तुम्हाला उद्योग वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरते असे सांगितले. डी.आय.सी. चे व्यवस्थापक जावळीकर यांनी शासनाच्या धाराशिव परिसरात उपलब्ध विविध योजनांचा उल्लेख त्यांच्या उत्तरात केला.देशमाने संजय यांनी एमआयडीसी परिसरात उद्योग स्थापना कशी करू शकतात आणि खास करून महिला उद्योजकांसाठी असणाऱ्या योजना मांडल्या. लघुउद्योग भारतीचे होनमुटे यांनी शिक्षणाचा उपयोग उद्योगासाठी कसा केला जाऊ शकतो आणि लघुउद्योग भारतीचे उद्योग वाढीसाठी असणारे कार्य मांडले, सिद्धेश्वर गारमेंटचे श्री. आकाश माळगे यांनी निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि मार्केटमध्ये उपलब्ध संधी याच्याबद्दल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले, प्र कुलगुरू प्रा. डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव प्रा. डॉ. भगवान साखळे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे डीन प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या मार्गद्शनाखाली घेण्यात आला.
    सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विक्रम शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन बस्सैये यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठ उपपरिसरातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. रमेश चौगुले, जल व भूमी व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. नितीन पाटील, जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख जितेंद्र कुलकर्णी, डॉ. गणेश शिंदे, उपपरिसरातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन मान्यवरांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना साठी शीतलनाथ एखंडे, शरद सावंत,शरद गिलबिले,सुरेश टकले आणि सौ. कुलकर्णी विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी कार्य केले.
error: Content is protected !!