August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.22 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 119 कारवाया करुन 76,800 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
  • बेंबळी पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)बालाजी दत्तु लोमटे, वय 35 वर्षे, रा. रुईभर, ता. जि. धाराशिव हे दि.22.11.2023 रोजी 15.50 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 840 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.22.11.2023 रोजी 18.00 ते 19.15 वा. सु. बेंबळी पो. ठा. 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)बाळासाहेब आत्माराम जाधव, वय 40 वर्षे, रा. महाळंगी, ता. जि. धाराशिव हे 18.00 महाळंगी येथील ग्रामपंचायत कार्यालय जवळ महाळंगी येथे मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 510 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)सतीश पांडुरंग सोनटक्के, वय 37 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव हे 19.15 छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील त्रिमुर्ती पान शॉपचे बाजूला झाडाखाली मुंबई मेन जुगाराचे साहित्यासह एकुण 650 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • आंबी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)योगेश सुरेश बैरागी, वय 27 वर्षे, रा. आनाळा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 18.00 वा. सु. आपल्या ताब्यातील टॅम्पो क्र एमएच 12 एफ.डी. 4131 हा आनाळा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आंबी पोलीसांना मिळून आला. तसेच 2)प्रज्योत बाळु शिंदे, वय 25 वर्षे, रा. देवुळगाव, ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 18.30 वा. सु.आपल्या ताब्यातील टॅम्पो क्र एमएच 06 जी. 2144 हा आनाळा चौकात सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आंबी पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये आंबी पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)सागर बलभिम जाधव, वय 29 वर्षे, रा. जेवळी दक्षिण, ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 13.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 ई 9738 हा जेवळी बाजार चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये लोहारा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)संजय गाणपतराव रावळे, वय 45 वर्षे, रा. केसरजवळगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 17.40 वा. सु. आपल्या ताब्यातील जिप क्र एमएच 34 एफ 0939 ही अक्कलकोट ते मुरुम जाणारे रोडवर बेंळंब बसस्थानक समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये मुरुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल”
  • तामलवाडी पोलीस ठाणे : तुळजापूर खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील- शंकर ज्योतिलींग चव्हाण, वय 27 वर्षे यांनी दि.22.11.2023 रोजी 12.20 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल विना नंबर असलेली ही सोलापूर ते तुळजापूर जाणारे एनएच 52 रोडवर बालाजी अमाईन्स समोर रस्त्याजवळ तामलवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • भुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- रामचंद्र लक्ष्मण शिंदे, वय 72 वर्षे, रा. वालवड, ता. भुम जि. धाराशिव यांचे राहाते घराचा कडी कोंडा अनोळखी आठ व्यक्तीने दि. 22.11.2023 रोजी 12.30 वा. सु. तोडून घरात प्रवेश करुन लोखंडी रॉडने फिर्यादीस मारहाण करुन फिर्यादी यांचे पत्नीचे गळ्यातील व हातातील सोन्याचे दागिने तसेच कपाटामधील असे एकुण 36 तोळे 5 ग्रॅम व रोख रक्कम 20,000₹ असा एकुण 7,50,000₹ किंमतीचा माल
  • फिर्यादीस मारहाण करुन जबरीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रामचंद्र शिंदे यांनी दि.22.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 397, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-मनीष गोपालकृष्ण कुलकर्णी, वय 52 वर्षे, रा. सांजा रोड धाराशिव यांचे संकेत हॉटेलच्या पाठीमागील शिवारात सर्वे नं 234 मधील असलली बीबीसी कंपनीची 05 एचपीची इलेक्ट्रीक पानबुडी मोटार अंदाजे 08,000₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मनीष कुलकर्णी यांनी दि.22.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • मारहाण.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)अंकुश शिवाजी शिरगिरे, 2)दत्तात्रय गणपत मोटे,3)शंकर गणपत मोटे, 4) शालन अंकुश शिरगिरे सर्व रा. गोंधळवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 10.15 वा. सु. गोंधळवाडी शिवारातील शेत गट नं. 246 मध्ये फिर्यादी नामे- संजय जगन्नाथ शिरगिरे, वय 30 वर्षे, रा. गोंधळवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन फिर्यादीस सोबत भांडण घालून फिर्यादी व फिर्यादीचे आई वडील यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने हातातील सत्तुरने फिर्यादीच्या डोक्यात, हातावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच नमुद आरोपींनी फिर्यादीचे वडीलांचे डोक्यावर सत्तुरने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीच्या आईस लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- संजय शिरगिरे यांनी दि.22.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 307, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) महादेव लहु लांडगे,2 ) मुन्ना लहु लांडगे, 3) किरण बाळासाहेब लांडगे, 4) बाळासाहेब डीगंबर लांडगे, 5) कविता लहु लांडगे, सर्व रा. खोंदला ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.17.11.2023 रोजी 18.00 वा. सु. खोंदला येथे फिर्यादी नामे-शुभांगी विशंभर जोगदंड, वय 30 वर्षे, रा. पिंपळगाव कमळेश्वर ता. वाशी जि. धाराशिव यांचे माहेरच्या घरासमोर नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन फिर्यादीच्या भावास शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली. फिर्यादी व तिची भावजय भांडण सोडवण्यास गेले असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. व नमुद आरोपीने फिर्यादीचे हातावर लोखंडी गजाने मारुन तिन बोटे फॅक्चर केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शुभांगी जोगदंड यांनी दि.22.11.2023 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 325,324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)अंकुश थावरु राठोड, रा. जामगा तांडा, ता. आळंद जि. कलबुर्गी, राज्य- कर्नाटक यांनी दि.22.11.2023 रोजी 18.00 वा. सु. मुरुम बसस्थानक समोरील रोडवर फिर्यादी नामे- संदीप आण्णाप्पा जमादार, वय 38 वर्षे, रा. कोथळी, ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने गाडीचा दरवाज्या उघडण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- संदीप जमादार यांनी दि.22.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) शाम रामा पवार, रा. कल्पना नगर, पारधी पिढी, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 22.11.2023 रोजी 20.30 वा. सु. कल्पना नगर पारधी पिढी कळंब येथे फिर्यादी नामे- सागर बलभिम पवार, वय 28 वर्षे, रा. कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपी याने मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन वेळुच्या काठीने डोक्यात डाव्या व उजवृया बाजूस मारुन जखमी केले. त्यावेळी फिर्यादी यांचे वडील भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- सागर पवार यांनी दि.22.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) हरि दत्तु माने, 2) ग्यानु हरि माने, 3) भरत हरी माने सर्व रा. काक्रंबावाडी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 19.30 वा. सु. क्राक्रंबावाडी येथे फिर्यादी नामे-छाया मोहन माने, वय 40 वर्षे, रा. काक्रंबावाडी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व त्यांचे मुलास नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने कपाळावर मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- छाया माने यांनी दि.22.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
  • “पान शॉपवर अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :दि.22.11.2023 रोजी पोलीस निरीक्षक- उस्मान शेख धाराशिव पोलीस ठाणे यांना 11.30 ते 12.10 वा. सु. गोपनीय माहिती मिळाली की, सम्राट चौक धाराशिव येथे पोस्ट ऑफीस शेजारील तुळजाई पान शॉप व हतलाई पान शॉप नावाचे दोन शॉपमध्ये दोन इसम महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या अवैध्य विक्री करत आहे. यावर पथकाने लागलीच सदर ठिकाणी जाउन नमूद इसमास नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे- 1) मधुसुदन नवनाथ देवगिरे, वय 28 रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव, 2) दिपक हनुमंत गायकवाड, वय 22 वर्षे, रा. शिवाजी नगर माळी प्लॉटींग, तांबरी विभाग, लिंबोणी बाग धाराशिव ता. जि. धाराशिव असे सांगितले त्यांच्या कडे अधीक चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्‌तर दिल्याने पथकाने सदर पान शॉपची पाहणी केली. त्यामध्ये पान मसाला, सुगंधित तंबाखू, बादशाहा, गोवा गुटखा पान बहार विमल पान मसाला चे पाउच असा एकुण 5,472 ₹ किंमतीचा गुटखा साठवण करुन सदरचा गुटखा विक्री करण्यासाठी पान शॉपमध्ये ठेवलेला मिळून आल्याने त्याचा सविस्तर पंचनामा करुन माल जप्त करुन ताब्यात घेउन पान शॉप गुटखा विक्री करणारे 1) मधुसुदन नवनाथ देवगिरे, वय 28 रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव, 2) दिपक हनुमंत गायकवाड, वय 22 वर्षे, रा. शिवाजी नगर माळी प्लॉटींग, तांबरी विभाग, लिंबोणी बाग धाराशिव ता. जि. धाराशिव यांचेविरुध्द भा.दं.सं. कलम- 272, 273, 188, 328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2003 कलम 26(2)(1), 26 (2)(4), 27(3)(ई), 30(2), 59 अन्वये गुरंन 437/2023 असा गुन्हा धाराशिव शहर पो.ठाणे. येथे 22.11.2023 रोजी नोंदवला आहे.
  • सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी- पोलीस निरीक्षक श्री.उस्मान शेख, सपोनि- साळवे, धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदार यांचे पथकाने केली.
error: Content is protected !!