धाराशिव – येथे माजी मुख्याध्यापक रघुनाथराव देशमुख (मांडवेकर)यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. प्रा. डॉ.शशिकांत देशमुख व श्री.श्रीकांत देशमुख यांच्या पुढाकारातून हा अमृतमहोत्सव पार पडला.या कौटुंबिक कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे उपस्थित होते. सोबतच या कार्यक्रमासाठी गुरुवर्य प्रभाकर दादा बोधले, माजी जि.प.सभापती लक्ष्मणराव देशमुख मांडवेकर,कळंब-धाराशिव आमदार कैलास पाटील, बीड कॉ.कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, लातुर कृ.उ.बा.समिती सभापती जगदीशराव बावणे,एम. डी.देशमुख,सुरेशराव देशमुख,मकरंद राजेनींबाळकर, अमितभैया शिंदे,अँड. अविनाश देशमुख,अँड. कमलाकार ताटे,शिवदास कांबळे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कॉं.कमिटीचे सचिव भुषणराव देशमुख यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला संबोधित करत असताना सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी लक्ष्मणराव देशमुख मांडवेकर यांच्या घराण्याचा इतिहास अधोरेखीत केला. तसेच स्व.विलासराव देशमुख यांच्या आठवनींना उजाळा दिला. व सत्कारमूर्ती रघुनाथराव देशमुख सरांच्या कार्याचा एकंदरित लेखाजोखा मांडला. शेवटी आभार मानत असताना कार्यक्रमाचे आयोजक प्रा.डॉ. शशिकांत देशमुख यांनी सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या,करतूतवाची उंची गाठलेल्या, चरित्र संपन्न व अभ्यासु व्यक्तिमात्वाच्या हातून माझ्या बाबांचा सन्मान होणे याला मी माझे पुण्य समजतो. अशा शब्दात आभार मानले. दिलीपराव देशमुख या कार्यक्रमाला संपूर्ण वेळ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली व भोजनाचा आस्वाद घेतला.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी