August 9, 2025

महाराष्ट्र लोकविकास मंचचे यंदाचे पुरस्कार जाहीर

  • कळंब – महाराष्ट्र लोकविकास मंच या स्वयंसेवी संस्थांच्या संघटनेमार्फत दिले जाणारे पुरस्कार घोषित करण्यात आले असून महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची निवड करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय सचिव भूमिपुत्र वाघ यांनी दिली.
    मुलं, महिला ,पाणी, रोजगार, दुष्काळ, शेती शेतकरी, हिंसामुक्त जीवन, महिलांचे सक्षमीकरण, कुटुंब सत्तेपासून राजसत्तेपर्यंत महिलांचा सहभाग नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्राला भूषण वाटावे अशा महिलांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीमाता फुले यांचा वारसा जपत कार्य करणाऱ्या ज्यांनी आपला आयुष्य केवळ सामाजिक बदलासाठी घालवलं. सर्व सावित्रीच्या लेकीचा सन्मान. 6 डिसेंबर 2023 रोजी पर्याय संस्था कळंब जिल्हा धाराशिव ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खालील मान्यवरांची निवड यावर्षी पुरस्कारासाठी करण्यात आली.
    प्रथम आणि बहुमानाचा पुरस्कार *जीवनगौरव पुरस्कार* महिला राजसत्ता आंदोलनाच्या प्रवक्त्या मंगलताई दैठणकर यांना प्रदान होईल.
    तर *कर्मयोगी कार्य गौरव पुरस्कार* खालील महिलांना प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये
    द्वारका चंद्रकांत पवार अहमदनगर, लीलावती केशवराव चव्हाण हिंगोली, विद्याताई वाघ धाराशिव, अनिता तोडकर छत्रपती संभाजीनगर, कालिंदी पाटील पुणे, कुशावार्ता बेळे लातूर.
    पंचकुला बिराजदार नांदेड, विजया धस यवतमाळ, शबाना शेख सांगली मेघनाताई कुलकर्णी पुणे सत्वशीलाताई घुले बीड, सुशीलाताई पाईकराव हिंगोली, संध्याताई बारगजे बीड, मंगलताई भिसे बीड, नर्मदा बळीराम जोगदंड परभणी या सर्व निवडलेल्या कर्मयोगी महिलांना शाल, श्रीफळ, हार, मानपत्र, देऊन पर्याय संस्था कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी मानवी हक्क दिनानिमित्ताने दहा डिसेंबर 2023 रोजी 10 वाजता सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यांच्या निवडीची पत्र महाराष्ट्र लोकविकास मंच या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर ,सचिव भूमिपुत्र वाघ यांच्या सहीने पाठवलेली आहेत.
    या कार्यक्रमाला, थोर समाजसेवक पन्नालालभाऊ सुराणा, विश्वनाथ अण्णा तोडकर,एम एन कोंढाळकर पुणे रमाकांत बापू कुलकर्णी पुणे, भूमिपुत्र वाघ,धाराशिव, मनीषा घुले बीड हे उपस्थित राहणार आहेत. यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती भूमिपुत्र वाघ यांनी दिली.
error: Content is protected !!