August 9, 2025

ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र;कळंबमध्ये शिवसैनिक-मनसैनिकांचा जल्लोष

  • कळंब – मराठी भाषेवर लादली जाणारी हिंदी सक्ती अखेर राज्य सरकारला मागे घ्यावी लागली. या निर्णायक विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत मराठी जनतेला एक सामर्थ्यशील संदेश दिला. या ऐतिहासिक क्षणाचा आनंद व्यक्त करत कळंब तालुक्यात शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार जल्लोष साजरा केला.
    शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी आणि जय महाराष्ट्र च्या गर्जना करत मराठीच्या विजयाचा आनंद साजरी करण्यात आला.मराठीच्या अस्मितेसाठी राजकीय वैचारिक मतभेद बाजूला ठेवत एकत्र आलेले ठाकरे बंधू हे या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरतील, असा विश्वास यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन काळे यांनी व्यक्त केला.
    कार्यक्रमात शिवसेना व मनसेचे स्थानिक नेते, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.प्रमुख उपस्थितांमध्ये शिवसेना तालुका प्रमुख सचिन काळे,उपजिल्हा प्रमुख प्रदीप मेटे,दिलीप पाटील, निवडणूक प्रमुख संजय मुंदडा,गोपाळ घोगरे,विश्वजित जाधव,शाम खबाले,सागर मुंडे, पंडीत देशमुख,ॲड.मंदार मुळीक, शकिल काझी,संतोष लांडगे, गोविंद चौधरी,डॉ.जोगदंड, समाधान बाराते,शशिकांत पाटील, शुभम करंजकर,बाळासाहेब कोल्हे,आश्रुबा बिक्कड,अक्षय बाराते,निखिल कापसे,राकेश जगताप,पुरुषोत्तम चाळक, बाळासाहेब गंभिरे,संजय भोसले, बिबिशन देशमुख,बिबिशन गायकवाड, कल्याण गुरसाळे, सुलेमान मिर्झा,निर्भय घुले,सागर शिगणापुरे,हर्षवर्धन पाटील,बंडू यादव,अफसर पठाण, संतोष पवार,अनंत अंबिरकर,सुरज सातव,महादेव अंबिरकर,मनोज चोंदे,भरत शिंदे,यांच्यासह शेकडो शिवसैनिक मनसैनिकांचा समावेश होता.
    मराठी माणूस आणि मराठी भाषा ही केवळ भावना नव्हे, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा गाभा आहे. ही लढाई ही केवळ एका अध्यादेशाची नव्हती, तर मराठी अस्तित्वासाठीची होती — आणि ती लढाई जिंकली गेली, असे मत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
    कार्यक्रमात सामूहिक घोषणा, ठाकरे बंधू एकत्र – मराठी विजयी च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
error: Content is protected !!