कळंब ( माधवसिंग राजपूत ) – कळंब बसआगार व बसस्थानकात प्रवेश करीत असताना आपणास प्रवेश द्वाराच्या बाजूला टाकलेला केर कचरा लांबच – लांबच रांगोळी काढल्यागत वाटत असून प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी उकिरडा,घाण,दुर्गंधी निर्माण झाली आहे.प्रवाशी तसेच रस्त्यावर फिरणारे नागरिक ही हि जागा लघुशंखे साठी उपयुक्त समजून आरामात या ठिकाणी लघु शंका उरकून घेत आहेत.याकडे कळंब आगार व्यवस्थापनाचे इतके दुर्लक्ष कशामुळे आहे ? त्यांना या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर साठी राज्य परिवहन मंडळाने स्पेशल गाड्यांची व्यवस्था केली आहे, यामुळे प्रवासी व गाड्यांची याता – यात वाढली आहे. यामुळे कळंब बस स्थानकात ही प्रवाशांची गर्दी असते अशा या गर्दीच्या व वरर्दळीच्या ठिकाणी सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.प्रवाशानां नाकास रुमाल लावून बस स्थानकात प्रवेश करावा लागतो याचबरोबर दिनांक ७ जुलै रोजी कथले युवक आघाडी च्या वतीने परतीच्या वारीतील वारकऱ्यांसाठी भव्य स्वरूपात दत्त मंदिर व बस आगार परिसरात मोठ्या प्रमाणात दिवसभर अन्नछत्र व्यवस्था असते यामुळे हा परिसर स्वच्छ असावा ही अपेक्षा प्रवाशांनी करणे गैर नाही तर ती संयुक्तिक आहे, याशिवाय यापूर्वी प्रवेशद्वारा शेजारी कचरा,घाण व लघवी करण्याची ठिकाण बनले होते परंतु कळंब शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्वच्छता करून झाडे लावून व प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे आसन व्यवस्था केली होती.त्यामुळे हा भाग स्वच्छ व घाण मुक्त राहिला परंतु गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी पुन्हा घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे तसेच आता पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचा प्रभाव वाढून मलेरिया, डेंगू यासारखे साथीचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.या सर्व गोष्टीचा विचार करून या ठिकाणी असलेली घाण स्वच्छ करावी व या परिसरात कायम स्वरूपात घाण होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरी व प्रवासी वर्गातून होत आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात