कळंब – पत्रकारांच्या कल्याणासाठी झगडत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया कळंब तालुक्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.सत्कार समारंभात पत्रकारांच्या पाल्यांना एकुण ३० कीटचे वाटप करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय पाटील दुधगावकर जि.प माजी अध्यक्ष धाराशिव हे होते, कार्यक्रमाचे उद्घाटक संजय पवार पोलीस उपविभागीय अधिकारी कळंब,नायब तहसीलदार गोकुळ भराडीया हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.रश्मी मारवाडी महिला विंग प्रदेशाध्यक्ष,व्हॉइस ऑफ मीडिया,उमेश पोतदार कृषी विभाग कळंब, केतनजी कात्रे शैक्षणिक विंग महाराष्ट्र राज्य, अमर भाई चोंदे कार्यवाहक महाराष्ट्र राज्य,व अशोक शिंदे अध्यक्ष कळंब तालुका पत्रकार संघ प्रामुख्याने यांची उपस्थिती होती.त्यावेळेस जमलेल्या पत्रकार बांधवांना पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पवार,संजय पाटील दुधगावकर माजी जि प अध्यक्ष,रश्मी मारवाडी महिला लिंग प्रदेश अध्यक्ष,आणि चेतन कात्रे या सर्वांनी मार्गदर्शन केले. यावेळेस सौ.संगीता वनकळस यांची महिला विंग जिल्हाध्यक्ष धाराशिव पदी निवड करण्यात आली.या कार्यक्रमाला व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्य,पत्रकार बांधव,भगिनी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोशी महाराज यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार,सुधाकर रणदिवे यांनी केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात