August 9, 2025

मोहेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेना बी आणि सी प्रमाणपत्र परीक्षेत उज्ज्वल यश

  • कळंब – ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी) लातूरच्या वतीने शैक्षणिक २०२४-२५ या वर्षासाठी बी आणि सी प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले.अनुक्रमे एनसीसी विभाग बी प्रमाणपत्र १९ आणि सी प्रमाणपत्र ०४ छात्र सैनिकांनी परीक्षा दिली होती.या परीक्षेत छात्रसैनिक यश मिळवत महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली,या यशाबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल मोहेकर ,उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल,संचालक डॉ.संजय कांबळे, महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान,उपप्राचार्य डॉ. के.डी.जाधव,प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी,अधीक्षक हनुमंत जाधव, अरविंद शिंदे,डॉ.श्रीकांत भोसले, डॉ.राघवेंद्र ताटीपामुल,डॉ.मीनाक्षी जाधव,प्रा.अर्चना मुखेडकर,प्रा. गोविंद काकडे,प्रा.अक्षय खंडागळे, प्रा.अभिजित बोबडे,लेफ्ट. सरस्वती वायबसे,डॉ.वर्षा सरोदे, प्रा.वर्षा काकडे,डॉ.रोहिणी लोकरे, डॉ.समाधान चंदनशिवे,महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.या परीक्षेसाठी विध्यार्थीना एनसीसी विभाग प्रमुख लेफ्ट.डॉ. के.डब्लू पावडे यांचे मार्गदर्शन राहिले.
error: Content is protected !!