धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.17 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 105 कारवाया करुन 64,750 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
कळंब पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)राजेंद्र तात्याराम शिंदे, वय 57 वर्षे, रा. कोठाळवाडी शिवार ता. कळंब जि. धाराशिव हे दि.17.11.2023 रोजी 17.30 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या मोकळ्या जागेत अंदाजे 11,200 ₹ किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आले. तर 2) नानाबाई सुरेश शिंदे, वय 46 वर्ष रा. मोडा पारधी पिढी मोहा, ता.कळंब, जि. धाराशिव या दि.17.11.2023 रोजी 17.00 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या पाठीमागे अंदाजे 11,200 ₹ किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
नळदुर्ग पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)सतिष दिनकर यादव, वय 43 वर्षे, रा. चिवरी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.17.11.2023 रोजी 16.30 वा. सु. चिवरी गावातील महालक्ष्मी मंदीराच्या पाठीमागे एमा पत्राच्या शेडच्या बाजूला अंदाजे 2,565 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. तर 2) लक्ष्मण नामदेव कोरे, वय 40 वर्ष रा. चिवरी, ता. जि. जि. धाराशिव हे दि.17.11.2023 रोजी 17.10 वा. सु.चिवरी गावातील महालक्ष्मी मंदीराच्या पाठीमागे पत्रयाच्या शेडच्या समोरच्या बाजूला अंदाजे 2,770 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. 3) दादाराव गणपती शिंदे, वय 45 वर्ष रा. चिवरी, ता. जि. जि. धाराशिव हे दि.17.11.2023 रोजी 17.40 वा. सु. चिवरी गावातील महालक्ष्मी मंदीराच्या पाठीमागे पत्रयाच्या शेडच्या समोरच्या बाजूला अंदाजे 2,150 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
येरमाळा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)सुनिल नामदेव शिंदे, वय 52 वर्षे, रा. चोराखळी ता. कळंब जि. धाराशिव हे दि.17.11.2023 रोजी 15.20 वा. सु. राहते घराजवळ रिकामे जागेत चोरखळी ता. कळंब जि. धाराशिव येथे अंदाजे 1,250 ₹ किंमतीची गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर 2)हिराबाई सुरेश शिंदे, वय 48 वर्ष, रा. संभाजी नगर येरमाळा ता.कळंब, जि. धाराशिव या दि.17.11.2023 रोजी 12.40 वा. सु. येडेश्वर मंदीर येथील श्रीनिवास बारच्या पाठीमागे बाभळीच्या झाडाखाली येरमाळा ता. कळंब येथे अंदाजे 15,600 ₹ किंमतीची गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये येरमाळा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
ढोकी पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)दत्ता पांउुरंग ओव्हळ, वय 36 वर्षे, रा. वानेवाडी ता. जि. धाराशिव हे दि.17.11.2023 रोजी 16.30 वा. सु. हिंगळजवाडी जाणारे रोडवरील येडेश्वरी ढाबा येथे अंदाजे 1,510 ₹ किंमतीची देशी दारुच्या बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव ग्रामीण पोलीसांनी दि.17.11.2023 रोजी 12.00 वा. सु. धाराशिव ग्रामीण पो. ठा. आळणी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)विलास पोपट विर, 2) विजयकुमार रामभाउ लावंड, 3) प्रदीप अशोक माने, 4) सोनबा जिवन पौळ, 5) संजय तुकाराम पौळ,6) बापु काशिनाथ पौळ सर्व रा. आळणी ता. जि. धाराशिव, हे आळणी येथे तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 4,250 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
येरमाळा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) प्रशांत अरुण राउत, वय 45 वर्षे, रा. बेदराई गल्ली बार्शी जि. सोलापूर हे दि.17.11.2023 रोजी 17.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 ई 0240 ही येडेश्वरी मंदीर रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
कळंब पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)संतोष राजाभाउ झोरी, वय 35 वर्षे, रा. मोहा, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.17.11.2023 रोजी 12.30 वा. सु.आपल्या ताब्यातील महिंद्रा वाहन क्र एमएच 25 एम 572 हा होळकर चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आला. तसेच 2)धनंजय विश्वनाथ गाढवे, वय 28 वर्षे, रा. बोर्डा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.17.11.2023 रोजी 14.40 वा. सु.आपल्या ताब्यातील ॲपे क्र एमएच 12 जीटी 2127 हा होळकर चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आला.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये कळंब पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- बेबी अनिल कांबळे, वय 49 वर्षे, रा. कवठा तांडा, ता. उमरगा जि. धाराशिव या त्यांचे पत्राचे शेडला कुलूप लावून लातुर येथे गेल्या असता अज्ञात व्यक्तीने दि. 09.11.2023 रोजी 12.00 ते दि. 16.11.2023 रोजी 16.00 वा. सु. कुलूप तोडून घरात प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटातील 11 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व चार साड्या असा एकुण36,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बेबी कांबळे यांनी दि.17.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 461, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)सुहास बळीराम शिवलकर, 2) विकास बळीराम शिवलकर, 3)संदेश सुहास शिवलकर, 4) आण्णासाहेब उर्फ सतिश विश्वनाथ शिवलकर, 5) तुकाराम विश्वनाथ शिवलकर सर्व रा. महादेववाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.15.11.2023 रोजी 11.00 वा. सु. महादेववाडी पाटी येथे फिर्यादी नामे-सुरेंद्र वसंत होळकर, वय 42वर्षे, रा. शिवाजीनगर महादेववाडी ता. जि. धाराशिव यांना शेत रस्त्याचे वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे चुलते निळकंट होळकरहे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी-सुरेंद्र होळकर यांनी दि.17.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे
तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) कार क्र एमएच 05 डीई 0466 चा चालक व अनोळखी एक महिला, यांनी दि. 17.11.2023 रोजी 13.00 वा. सु. तुळजापूर ते सोलापूर जाणारे एनएच 52 रोडवर देवराज धाब्याजवळ फिर्यादी नामे-राहुल महेश अवचार, वय 38 वर्षे, रा. रा. ऑल 03,38 मॅजेस्ट्री पार्क, वडाची वाडी, उंद्री चौक पुणे यांचे कार समोर सतत मागे पूडे कार करीत असल्यामुळे फिर्यादीने गाडी थांबवून नमुद अरोपींना विचारल्याचे कारणावरुन नमुद अनोळखी महिलेने फिर्यादीस शिवीगाळ करुन धक्का देवून खाली पाडून हातास गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- राहुल अवचार यांनी दि.17.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 325, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- अमीर रफीक पटेल, वय 30 वर्षे, सोबत त्यांची पत्नी- मयत नामे- शन्नु अमीर पटेल, वय 25 वर्षे, मुलगी उरफा रा. गणेश नगर, हैद्राबाद रोड, सोलापूर ता. जि. सोलापूर दि 17.11.2023 रोजी 18.00 वा. सु. एनएच 65 रोडवर काली मज्जीद, नळदुर्ग समोरील रोडवर नळदुर्ग शिवार येथे जात होते. दरम्यान ट्रक क्र के. 56- 4353 चा चालक आरोपी नामे- गफुर शेख यांनी त्याचे ताब्यातील ट्रक हा भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन अमीर पटेल यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात फिर्यादीची पत्नी शन्नु पटेल या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी अमीर पटेल यांनी दि.17.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) 427 सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात