August 9, 2025

महात्मा बसवेश्वरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा उत्साहात साजरा

  • लातूर – आज देशाला चांगल्या विचारांची गरज असून तो विचार आपण विविध क्षेत्रात राहून देखील जोपासत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मित्रत्वाचं नातं काय असतं हे अनेकांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. अलिकडे गेट-टुगेदरचे आयोजन देखील मोठ्या प्रमाणावर गावोगावी माजी विद्यार्थ्यांकडून केले जात आहे. त्यापैकीच एक असलेले लातूरच्या श्री महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील १९९३-९४ बँचचे माजी विद्यार्थी २९ वर्षांनी एकत्र जमून स्नेह मेळावा आयोजित करतात असे एकत्र येणे आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक अँड. श्रीकांत अप्पा उटगे यांनी अध्यक्षीय समारोप करताना केले.
    लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात नुकताच स्नेह मिलन मेळावा संपन्न झाला यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी विचारमंचावर महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब गोडबोले, माजी प्राचार्य डॉ. एम. एस. दडगे, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, माजी विद्यार्थी तथा सेवानिवृत्त सहसंचालक विजयकुमार तोगरे, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. डॉ. मच्छिंद्र खंडागळे, सुवर्णा गीरवलकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    याप्रसंगी भूगोल विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब गोडबोले, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, माजी विद्यार्थी विजयकुमार तोगरे व सुवर्णा गिरवलकर यांनी संस्था, महाविद्यालय व गुरुवर्यांविषयी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनाजी तोडकर, हनुमान रांदड, अंगद पवळे, सतिश गायकवाड, महेश मोटे, नागेश सोनटक्के, अनिता यादव, शिरीष पाटील आदींनी पुढाकार घेतला.
    तसेच लक्ष्मण बदिमे, प्रा. ज्ञानोबा गायकवाड, डॉ. सुभाष कुमार, शिवाजी कोराटे, किरण भुसे, रमेश चव्हाण, राजाभाऊ हराळकर, राजकुमार केंचे, माधव पुंडकरे, जलील शेख, रोहिणी स्वामी, सुनिता सूर्यवंशी, दिगंबर मिटकरी, जानुमियाँ शेख, विलास कराड, सोपान शिंदे, रमेश बर्गे, कृष्णा चेपट, किरण टेकाळे, सतिश पुंड, सिद्धलिंग हुच्चे, बालाजी शेळके, नामदेव बेंदरगे, दिलीप मिंड आदींनी विविध क्षेत्रात काम करत असल्याचा स्वतःचा परिचय व शिक्षण घेत असतानाच्या महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देऊन महाविद्यालय व शिक्षकांविषयी यावेळी भावस्पर्शी मनोगते व्यक्त केली.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मच्छिंद्र खंडागळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगद पवळे तर आभार सतिश गायकवाड यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!