कळंब (माधवसिंग राजपूत यांजकडून ) – पोटाची खळगी भरण्यासाठी भटका समाज स्वतःचे गांव सोडून स्थलांतर करत असतो. मुळ गांव पाठीमागे सोडल्यावर गायरान किंवा कुणाच्यातरी जागेवर चार लाकडं आणि प्लास्टिक पेपरचा पाल ठोकून आश्रय घ्यावा लागतो. संपूर्ण कुटुंब कबिल्यासह रहाणारा हा समाज दिवसभर मेहनत करुन स्वतः सहित कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असतो. कुठलाही दिवस कामातच जात असल्याकारणाने सणवार तितक्या उत्साहात साजरा करता येत नाही. त्यांच्यासाठी दिवाळी आणि इतर दिवसांमध्ये फारसा फरक असत नाही. समाजात राहून समाजापासून दूर असलेल्या कष्टकरी, वंचित समाजासोबत सहभोजन आयोजित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद पाटील यांनी पुढाकार घेतला होता. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष राऊत यांनी सहभागी होत सहभोजन केले आणि महिला भगिनींना ओवाळणी घालण्यात आली. सहभोजन उपक्रमास राष्ट्रिय स्वयंसेवक संघ जिल्हा संघचालक अनिल यादव, भारतीय जनता पार्टी कळंब तालुका अध्यक्ष अजित पिंगळे, कळंब पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक एच.पी.कांबळे, पोलिस उपनिरीक्षक पिलंदवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काका भडंगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे महादेव महाराज आडसुळ, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे, मिनाज शेख, राजेंद्र बिक्कड, संजय जाधवर, युवराज धाकतोडे, शिवाजी गिड्डे पाटील, संजय जाधवर, ज्येष्ठ पत्रकार माधवसिंह राजपुत, अनंत बोराडे, रफीक सय्यद, सुनिल बिक्कड, परशुराम देशमाने, पोलिस काॅन्स्टेबल ईरफान शेख यांनी भेट दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बंडू आबा ताटे, दत्ता पौळ, निलेश पांचाळ, सचिन डोरले, भावेश बारगजे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात