कळंब – राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या शेगाव येथील पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात धाराशिव जिल्ह्यातील विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर यांनी सांगितले आहे. 19 नोव्हेंबर रोजी शेगाव जिल्हा बुलढाणा येथे राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन संपन्न होत आहे. अधिवेशनाचे उद्घाटन माननीय डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य बबनरावजी तायवाडे हे असणार आहेत. आमदार आकाश फुंडकर, सुधाकर अडबाले,बाळाराम पाटील,महासचिव सचिन राजूरकर,अभिजीत वंजारी ऍड.बी एल सगर किल्लारीकर, परिणय फुके, भलाचंद्र ठाकरे, इत्यादी उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्ह्यातील दीपक राव जाधव व संतोष भोजने यांना डॉ. पंजाबराव देशमुख ओबीसी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तर महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श पुरस्कारासाठी बाळासाहेब चिवडे, विक्रम पाचंगे, खिजर मोरवे, भैरवनाथ कानडे, अनंत फुलसुंदर,आदर्श कर्मचारी उत्तम संघटक म्हणून बालाजी पांचाळ यांची आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श पुरस्कारासाठी रोहिणी होण खांबे यांची निवड करण्यात आल्याचे राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर यांनी कळविले आहे. सदर अधिवेशनात ओबीसी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा होऊन सदरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. नॉन क्रिमिलियर ची मर्यादा वाढविण्यात यावी ओबीसी संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्याचे ठराव यावेळी करण्यात येणार आहेत. अधिवेशनासाठी धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर जिल्हाध्यक्ष संतोष भोजने, जिल्हा कार्याध्यक्ष दीपक हजारे, आबा माळी,सुहास दराडे, अनंत फुलसुंदर दयानंद जवळगावकर, सचिन राऊत, व्यंकट क्षीरसागर, कल्याणी सुतार, परमेश्वर साखरे मच्छिंद्र बोकडे,बालाजी माळी, रहीम तांबोळी, भास्कर कांबळे, सखाराम शिंदे,बाळासाहेब कांबळे, तानाजी तरंगे भुजंग लोकरे,यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात