August 9, 2025

आरोग्य क्षेत्रात समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय

  • उमरगा – येथील समाज विकास संस्थेच्या वतीने गेली दीड वर्षांमध्ये जनरल ड्युटी असिस्टंट नावाचा कोर्स सुरू आहे.या कोर्सच्या माध्यमातून दर तीन महिन्याला एक स्वतंत्र बॅच प्रॅक्टिससाठी बाहेर पडते.सहा महिन्याच्या कोर्सनंतर प्रत्येक बॅचमध्ये तीस ते पन्नास युवक प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात.आज गेली दीड वर्षांमध्ये किमान 200 मुलीनी जनरल ड्युटी असिस्टंट कोर्स पूर्ण केला आहे लोहारा उमरगा तालुक्यातून या मुलींनी आपले आरोग्य क्षेत्रात खूप चांगले स्थान मिळविले आहे.उमरगा,लोहारा,मुरूम शहरातील प्रत्येक दवाखान्यामध्ये आज मुलींना नोकरी मिळाली आहे.आरोग्य क्षेत्रातील कार्य आणि सामाजिक बदलाचे खूप मोठे कार्य समाज विकास संस्था करत असल्याचे प्रशिक्षिका/ प्राचार्य डॉक्टर कल्पना वाघ ( खोबरे) यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.पुढे त्या म्हणाल्या की सहकारी,निम सहकारी आणि खाजगी दवाखान्यामध्ये बऱ्याच वेळा प्रशिक्षित स्टाफ मिळत नव्हता.परंतु हे सेंटर सुरू झाल्यापासून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आता प्रशिक्षित स्टाफ कार्यरत असल्याचे समाधान व्यक्त केले.
    स्थानिकच्या हॉस्पिटलचे डॉक्टर आवर्जून गरज पडेल तेव्हा स्टाफच्या संदर्भात समाज विकास संस्थेस संपर्क करत आहेत.आणि प्रत्येक मुलीला आज नोकरी लागत आहे. हे कार्य करण्यासाठी वात्सल्य ट्रस्ट कांजूरमार्ग मुंबई चे कार्यकारी मंडळ (विश्वस्त ) यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ यांनी सांगितले. तसेच समाजातील दहावी बारावी पास युवा युती यांनी जनरल ड्युटी असिस्टंट या कोर्सचा लाभ घ्यावा.नवीन ऍडमिशन साठी
    9172972482 यावरती नक्की संपर्क करावा असे आवाहन केले आहे.
error: Content is protected !!