August 9, 2025

वेद संकुलात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

  • कळंब (शिवराज पौळ) – १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाचा उत्सव वेद संकुलात मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने आणि भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
    कार्यक्रमाची सुरुवात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.त्यानंतर प्राचार्य सतिश मातने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र गीताच्या गजरात संपूर्ण संकुल देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले होते.
    प्राचार्य सतिश मातने यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्य निर्मितीचा इतिहास सांगितला. तसेच महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन यांचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी संघटनेचे व स्वाभिमानाचे मूल्य समजावून सांगताना सामाजिक ऐक्याचेही महत्त्व अधोरेखित केले.
    याप्रसंगी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशिका कोमल मगर,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक अर्जुन मंडाळे,विनोद कसबे,सोनाली ढमाले आणि विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!