August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव जिल्हा पोलिसनामा
  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि. 11 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 105 कारवाया करुन 80,200 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
  • वाशी पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)विलास देवराव काळे, वय,42 वर्षे, रा. सरमकुंडी, ता. वाशी जि. धाराशिव हे दि.11.11.2023 रोजी 12.30 वा. सु. आपल्या राहात्या घरा शेजारी अंदाजे 2,450 ₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 2)अक्काबाई लाला शिंदे, वय,45 वर्षे, रा. शेंडी पाटी, ता. वाशी जि. धाराशिव हे दि.11.11.2023 रोजी 12.40 वा. सु. आपल्या राहात्या घरा बाजूस अंदाजे 1,170 ₹ किंमतीची 16 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 3)सखुबाई प्रकाश पवार, वय,22 वर्षे, रा. लोणखस, पारधी पीडी, ता. वाशी जि. धाराशिव हे दि.11.11.2023 रोजी 15.15 वा. सु. आपल्या राहात्या घराचे पत्रयाचे शेडसमोर अंदाजे 1,800 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
  • नळदुर्ग पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)विजय भिमा शिंदे, वय,27 वर्षे, रा. चिकुंद्रा, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.11.11.2023 रोजी 11.50 वा. सु. शिवनेरी पान स्टॉलच्या डावे बाजूस अंदाजे 945 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 27 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • येरमाळा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)प्रकाश ज्ञानोबा धोंगडे, वय 45 वर्षे, रा. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 11.11.2023 रोजी 16.50 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एजे 2735 हा तेरखेडा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना येरमाळा पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
    “ सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने ज्वलनशील पदार्थ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
    येरमाळा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) दशरथ मारुती संदले, वय 55 वर्षे, रा. भुम ता. भुम जि. धाराशिव, 2) कुझेन नयुम सौदागर, वय 19 वर्षे, रा. भुम ता. भुम जि. धाराशिव हे दोघे दि.11.11.2023 रोजी 16.00 ते 16.55 वा. सु. खामकर कॉम्पलेक्स तेरखेडा समोर बाजार रस्त्याचे बाजूला तेरखेडा येथे बेकायदेशीरपणे विना परवाना रस्त्याचे बाजूला उकळत्या तेलाची कडई ठेवून स्वत:हास, मानवी जिवीतास धोका व मालमत्तेस धोका होवून जिवीत किंवा वित्त हानी होवू शकते याची जाणीव असताना ही निष्काळजीपना करुन भा.दं.वि.सं. कलम-285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द येरमाळा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
    धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- इम्रान हबीब शेख, वय 27 वर्षे, रा. मुन्शी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे चालवत असलेल्या ट्रक क्र केए 56-4013 मध्ये 500 कट्टे शेंगदाना बी भरुन तालोड गुजारात येथुन नागरकरनुल येथे जात असताना दि. 10.11.2023 रोजी 05.30 सरमकुंडी फाटा ते इंदापूर कारखाना येथे अज्ञात व्यक्तीने ट्रकची ताडपत्री फाडून, रस्सी तोडून ट्रकमधील 18 कट्टे शेंगदाना बी अंदाजे 1,08,000₹ किंमतीचा चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- इम्रान शेख यांनी दि.11.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)गोपीनाथ शंकर मते, 2)चंद्रकांत माणिक मते, 3) अरुण दामू मते, 4) चंद्रकांत मते,सर्व रा.दहीफळ, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.09.11.2023 रोजी 08.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक दहीफळ येथे फिर्यादी नामे- सुनिल लहु मते, वय 35 वर्षे, रा. दहीफळ ता. कळंब जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपीनी फिर्यादीस शिवीगाळ करुन घरातुन ओढत आणून लाथाबुक्यांनी,लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुनिल मते यांनी दि.11.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 452 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)मल्लीनाथ नागनाथ पाटील, 2)धनराज आण्णाराव पाटील, 3)वैजिनाथ चंद्रकांत बशेट्टी, 4) बसु कल्लया स्वामी,सर्व रा.नांदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.10.11.2023 रोजी 17.00 वा. सु. नांदगाव शिवार सिध्दलिंग गुड्डे यांचे पडीक शेतात येथे फिर्यादी नामे- कविता राजु राठोड, वय 40 वर्षे, रा. हंगरगा नळ तांडा, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना राहाण्यासाठी पाली टाकण्याच्या कारणावरुन नमुद आरोपीनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,कुह्राड व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- कविता राठोड यांनी दि.11.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 326, 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ फसवणुक.”
  • भुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- पारुबाई माणिक अंधारे, वय 62 वर्षे, रा. वांगी खु ता. भुम जि. धाराशिव या दि. 09.11.2023 रोजी 13.00 वा. सु. भुम बसस्थानक चे पाठीमागे भुम येथे असताना आनोळखी तीन व्यक्तीने पारुबाई अंधारे यांना विश्वासात घेवून सोन्याचे बिस्कीट देतो असे सांगून त्यांचे गळ्यातील 11 ग्रॅम वजनाचे सोन्याचे काड्याची माळ अंदाजे 25,000₹ किंमतीची घेवून त्यांना सोन्याची नकली बिस्कीट देवून विश्वासघात करुन फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी- पारुबाई अंधारे यांनी दि.11.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 420, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • शिराढोण पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)आप्पासाहेब सुनिल बोराडे, 2) बाळु सुनिल बोराडे रा. धामणगाव, ता. आष्टी जि. बीड व एक अनोळखी यांनी दि. 23.10.2023 रोजी 15.30 वा. सु. श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रा. लि. सामसवाडी ता. कळंब येथील यार्डातुन फिर्यादी नामे- अजिनाथ विश्वनाथ इथापे, वय 46 वर्षे, रा. पांढरवाडी ता. पाटोदा जि. बीड यांचे मालकीचा महिंद्रा अर्जुन डीआय ट्रॅक्टर क्र एमएच 23 बी. सी 2232 हे नमुद आरोपींनी विनापरवानगीने घेवून गेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- अजिनाथ इथापे यांनी दि.11.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 406, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ रस्ता अपघात.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे : मयत नामे- शेबाई उर्फ शाबाई विठ्ठल काळे, वय 73 वर्षे, रा. वांगी, ता. उत्तर सोलापूर या दि 08.10.2023 रोजी 19.30 वा. सु. सांगवी काटी येथे तुळजापूर ते सोलापूर जाणारे रोडवर एनएच 52 हायवे वर निसर्ग हॉटेल समोरुन पायी रस्ता ओलांडत होत्या. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एआर 8734 च्या चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून शाबाई काळे यांना धडक दिली. या आपघातात शाबाई काळे या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी उत्तम विठ्ठल काळे, वय 41 वर्षे, रा. वांगी ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांनी दि.11.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे : मयत नामे- मोहन तुकाराम सुरवसे, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि 07.11.2023 रोजी 16.00 वा. सु. दुर्गादास अमृतराव यांचे तुळजापूर येथील शेतासमोरील लातुर तुळजापूर रोडवर मोटरसायकल क्र एमएच 25 एएक्स 2597 वरुन जात होते. दरम्यान फोर्ड इंडीवर कार क्र एमएच 24 एएस 1800 च्या चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून मोहन सुरवसे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात मोहन सुरवसे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी प्रशांत वशिष्ट सुरवसे, वय 42 वर्षे, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.11.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम 184अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- गोविंद धनाजी सावंत, वय 28 वर्षे, व त्यांची पत्नी- गिता गोविंद सावंत, वय 25 वर्षे, मुलगा गणराज, मुलगी गैरवी रा. खामगाव, ता.जि. धाराशिव हे सर्वजन दि.09.11.2023 रोजी खामगाव पाटी येथे बाजूचे बाकावर बसलेले होते. दरम्यान हयुंडाई आय 20 गाडी क्र एमएच 24 एडब्ल्यु 1363 चा चालक नामे शुभम शिंदे रा. मुरुड ता. जि. लातुर यांनी त्याचे ताब्यातील कार ही चुकीच्या दिशेने चालवून हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून फिर्यादीच्या पत्नी गिता, मुलगा गणराज, मुलगी गैरवी व वसंत वाकडे, तडवळा बंकट काळे यांना धडक दिली. या आपघातात फिर्यादीची पत्नी गिता सावंत व आरोपी नामे शुभम शिंदे हे दोघे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर फिर्यादीचा मुलगा गणराज, मुलगी गैरवी व शेजारी बसलेले वसंत वाकडे, तडवळा, बंकट काळे हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी गोविंद सावंत यांनी दि.11.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम 184अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!