August 9, 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे २० व्या शतकाला वैचारिक वळण – प्राचार्य.डॉ.कुंभार

धाराशिव – व्यक्तिमत्त्वाचा विकास सामाजिक क्रांती आणि गुणात्मक शिक्षण अत्यावश्यक असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. तसेच स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय याबरोबरच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे नव तत्त्वज्ञान डॉ.बाबासाहेबांनी सांगून विसाव्या शतकाला वैचारिक वळण लावले असल्याचे प्रतिपादन विचारवंत तथा प्राचार्य नागोराव कुंभार यांनी दि.९ एप्रिल रोजी केले.
धाराशिव शहरातील सोनाई फंक्शन हॉलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवशीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.पहिल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार या विषयावर प्राचार्य डॉ.कुंभार बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा हे उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ.कुंभार म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्येला देव मानणारे होते. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षण शिकविताना विज्ञाननिष्ठ द्यावे, पक्षपातीपणा करू नये असे सांगितले.तर शिक्षण मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढविण्यासह शिक्षण चिकित्सक वृत्ती वाढवीत असल्याचे डॉ.बाबासाहेबांनी सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शिक्षणाचा अर्थ जाणीव करून देणे असून शीर संवर्धन करण्याबरोबरच ज्ञान मिळते असेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे शिक्षण हे धर्मनिरपेक्ष असावे मात्र धर्म आधारित असू नये असे निक्षून सांगत ते म्हणाले की, शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क असून ते प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असले पाहिजे आणि ती शासनाची जबाबदारी असावी असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. तर पालकासह विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वस्त स्थान देणे आवश्यक असून शिक्षक हा फोर मेन असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेबांनी समाज सुधारण्यासाठी विविधांगानी सलग २५ वर्ष चळवळी केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पन्नालाल सुराणा म्हणाले की, निवडणुकीमध्ये महिला व पुरुष लढत नाही हे आपले अपयश असल्यामुळे प्रत्येक महिला व पुरुषांनी निवडणूक लढविली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.तर शिक्षणामुळे चारित्र्यसंपन्न होण्याबरोबरच शिक्षण हा तळागाळातील सर्वसामान्यांचा करता धरता व जीवन व्यापं असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणामुळे नोकरी बरोबरच राष्ट्राची उभारणी करता येत असल्याचे ते म्हणाले की अध्यापनातील वनवा काढल्या पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले.
विशेष म्हणजे विषमतेवर आधारित असलेली समाज रचना बदलण्यासाठी विरोध करून ती समतेवर आधारित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन सुराणा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विचार मंचचे अध्यक्ष प्रा.रवी सुरवसे यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र अंगरखे यांनी व उपस्थितांचे आभार विकास काकडे यांनी मानले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील,त्रिशाला ठाणांबीर,त्रिशाला गवळी, मनीषा ताकतिरे,शामल तापकिरे,लीना सोनकांबळे,सुदेश माळाळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विचार मंचचे डॉ. रत्नाकर म्हस्के,प्रा.डॉ.दिनकर झेंडे,जगदीश जकाते,नागनाथ गोरसे,मारोती पवार,दीपक कांबळे,सी.के.मस्के,प्रा ए.एस. कळासरे,अमोल गडबडे, डॉ अजित कांबळे,मिलिंद जानराव, हनुमंत गायकवाड आदींसह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना केले सन्मानित –
सेवानिवृत्त शिक्षकनागनाथ गोरसे,प्राचार्य बाळासाहेब मुंडे, कसबे तडवळा जिल्हा परिषद शाळा, साहित्यिक व शिक्षक पंडित कांबळे,साहित्यिक जयराज खुणे,सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे, साहित्यिक युवराज नळे,नितीन तावडे,पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे व उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे यांनासन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र,शाल व बुके देऊन यथोचित सन्मानित करण्यात आले.

error: Content is protected !!