कळंब – येथील दक्षिण मुखी हनुमान भजनी मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन दिन संत तुकाराम महाराज बिज उत्सव ” फाल्गुन कृष्ण २” दिनांक १६ मार्च रविवार रोजी कळंब येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर भजन गायन कार्यक्रम घेण्यात आला, आम्ही जातो आमच्या गावा ! आमचा रामराम घ्यावा !! या संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे भजन गायन करीत दुपारी १२.०० वाजता गुलाल व फुले उधळून आरती करण्यात आली यानंतर भक्त तानाजी कदम यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे खीर प्रसाद वाटप करण्यात आले. याप्रसंगी छत्रभुज चोंदे, कीर्तनकार ह.भ.प.शिंदे गुरुजी, बब्रुवान कोळपे,बंडू मुंडे, मुरलीधर चोंदे (मृदंगाचार्य ) पांडुरंग माळवदे ( हार्मोनियम वादक ),रामदास जाधव, साहेबराव लोंढे,आप्पा हाजगुडे , किसनराव खामकर,प्रकाश कदम ,चौरे,परिमळा घुले, नंदाबाई पांचाळ,मैनाबाई माळी,कमलबाई पांचाळ, दक्षिणमुखी हनुमान भजनी मंडळातील सदस्य व भक्त यांची उपस्थिती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात