धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि. 06 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 137 कारवाया करुन 1,09,150 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- सुदर्शन भाउचंद कंदले, वय 34 वर्षे, रा.श्री. तुळजाभवानी साखर कारखाना नळदुर्ग जवळ ता. तुळजापूर यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 05.11.2023 ते दि. 06.11.2023 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 63 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 100 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, तांब्याची घागर, एलईडी टी व्ही डिव्हीडी असा एकुण 2,74,800 किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुदर्शन कंदले यांनी दि.06.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- निसार गफार शेख, वय 42 वर्षे, रा. बेंबळी, ता. जि. धाराशिव यांची अंदाजे25,000₹ किंमतीची हिरो होंडा स्प्लेडंर प्लस क्र एमएच 25 एस 3890 काळ्या रंगाची निळे पट्टे असलेली ही दि. 26.10.2023 रोजी 08.00 वा. सु. सरकारी दवाखाना येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- निसार शेख यांनी दि.06.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-विठ्ठल देविदास कोळगे, वय 33 वर्षे, रा. पळसवाडी, ता. जि. धाराशिव यांचे एमएसईटीसीएल च्या बाजूला पेट्रोल पंपाचे समोर तुळजापूर रोड शेकापूर शिवार धाराशिव येथील प्रगत तांत्रिक स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था धाराशिव फर्मचे पत्राचे शेडचे ईलेक्ट्रिक दुरुस्तीचे वर्कशॉपचे पत्राचे नटबोल्ट दि. 04.11.2023 रोजी 23.00 ते दि. 05.11.2023 रोजी 11.30 वा. सु. काढून आतमध्ये प्रवेश करुन ॲल्युमिनीयम स्पेअर, एलव्हीएचव्ही रॉड, ब्रास नट, कॉपर वायर, पाण्याचा पाईप, ग्राइंड मशीन, ब्लोअर मशीन, कॉपर सुपर वायर, केबल कॅपींग मशीन, ब्लोअर मशीन, कॅम्प मिटर,ऑईल 290 लिटर,ॲल्युमिनीयम भंगार, स्क्रॅप, आर्माड केबल कॉपर, कागद पत्रे व नोंदवहृया, लोखंडी सी चॅनल, ॲल्युमिनीयम तार, कॉम्प्युटर सीपीयु, असा एकुण 2,54,515₹ माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- विठ्ठल कोळगे यांनी दि.06.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 461, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)बाळासाहेब भगवान धस, 2) रुक्मिनी बाळासाहेब धस,3) भाउसाहेब बाळासाहेब धस, 4) धनाजी बाळासाहेब धस सर्व रा. भांडगाव ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.06.11.2023 रोजी माणकेश्वर ते भांडगाव जाणारे रस्त्यावर फिर्यादी नामे- गोरख भगवान धस, वय 52 वर्षे, रा. भांडगाव, ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीनी विहीरीचे पाण्याचे बारीचे कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- गोरख धस यांनी दि.06.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)दादा शामराव शिंदे, 2)ऋषीकेश शामराव शिंदे, 3) निशांत पिंटू शिंदे, 4) मनोज शामराव शिंदे, सर्व रा. शिंगोली, ता. जि. धाराशिव, यांनी दि.04.11.2023 रोजी 23.00 वा. सु. शिंगोली बसस्थानक येथे फिर्यादी नामे- ऋषीकेश सुधाकर ढवळशंख, वय 23 वर्षे, रा. पॉपीलर नांगराचे दुकानासमोर शिंगोली जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु संध्या रविंद्र गायकवाड या महिलेच्या भांडणात का पडतोस? या कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- ऋषीकेश ढवळशंख यांनी दि.06.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)गोरख भगवान धस, भांडगाव, ता. परंडा जि. धाराशिव, यांनी दि.06.11.2023 रोजी 12.45 वा. सु. सपकाळ वस्तीजवह माणकेश्वर ते भांडगाव जाणारे रोडवर फिर्यादी नामे-भाउसाहेब बाळासाहेब धस, वय 32 वर्षे, रा. भांडगाव, ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी भाउसाहेब धस यांनी दि.06.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी