August 9, 2025

माडज येथे ज्येष्ठ नागरिक महासंघ शाखेचे उद्घाटन

  • उमरगा (माधवसिंग राजपूत )- ज्येष्ठाना आपले उर्वरित आयुष्य समाधानाने आनंदाने व सुखाने जगावे यासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघ राज्य तसेच देश पातळीवर काम करीत आहे.ज्येष्ठ नागरिक महासंघ हा टेन्शनर साठी आहे आपल्या आयुष्यात दुःख कुणाला सांगायचे असा प्रश्न असतो एकत्रित आल्याने आपल्या समस्यांचे समाधान करता येते तसेच ज्येष्ठासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हेल्पलाइनच्या माध्यमातून काम सुरू आहे. मुलं सांभाळत नसतील तर त्यांचे समुपदेशन तसेच गरज पडली तर ज्येष्ठासाठी 2007 च्या कायद्या आधारे न्याय मिळतो विचाराचे सलाईन देण्याचे काम या माध्यमातून होत आहे. सुरक्षितता व आरोग्य यासाठी देखील जेष्ठ नागरिक संघ काम करीत आहे असे विचार डॉ.बी.आर.पाटील ज्येष्ठ नागरिक महासंघ मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांनी उमरगा तालुक्यातील माडज येथील ज्येष्ठ नागरिक महासंघ शाखा उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अँड.मनोहर गायकवाड हे होते तर मंचावर महासंघाचे मराठवाडा प्रदेश सचिव प्रभाकर कापसे धाराशिव जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ ,उमरगा तालुकाध्यक्ष राजू बोधले सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ, बंडू (आबा ) ताटे ,संदीप कोकाटे माधवसिंग राजपूत यांची उपस्थिती होती याप्रसंगी मराठवाडा प्रदेश सचिव प्रभाकर कापसे यांनी संघटनेचे महत्त्व विषद करून संघटनेमुळे आपण एकत्रित आलो आहोत. संघटनेमुळे प्रश्न सुटतात राज्य शासनाच्या योजना आपणा पर्यंत पोहोचाव्यात यासाठी संघटना काम करीत आहे आपण मोठ्या संख्येने या संघटनेत सहभागी व्हावे यामुळे आपणास संवाद राहील तसेच महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत ,नगरपरिषद स्तरावर विरंगुळा केंद्र योजना सुरू केली आहे प्रत्येक गावात विरंगुळा केंद्र झाले पाहिजे असे सांगितले तर महादेव महाराज अडसूळ यांनी धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या जास्तीत जास्त शाखा सुरू करण्यात येत असून त्यांचा प्रतिसाद मिळत आहे तसेच ज्यांची दानत आहे अशा लोकांनी ज्येष्ठासाठी मदत करावी. त्यांना आधार देण्याचे काम करावे आर्थिक कमकुवत वर्गातील ज्येष्ठांना मदत देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक महासंघ करीत आहे असे सांगितले तर माधवसिंग राजपूत यांनी ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावे शासनाने जाहीर केलेले 2013 चे ज्येष्ठ नागरिक धोरण लागू करावे अशी मागणी केली. या कार्यक्रमात दीपक गैहरवार ,भूमिपुत्र वाघ, विठ्ठल गायकवाड ,राजू बोधले यांनी ज्येष्ठांच्या विविध समस्या मांडल्या तर अध्यक्ष समारोप एॕड ,मनोहर गायकवाड यांनी ज्येष्ठना कायदेशीर मोफत सल्ला देण्यात येईल असे सांगून ज्येष्ठांनी आपल्याशी संपर्क करावा असे सांगितले कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उमरगा तालुका अध्यक्ष म्हणून राजू बोधले यांची निवड करण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू बोधले यांनी सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी तर आभार दिगंबर फुगटे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणपती फुगटे, गोविंद जाधव, मधुकर गायकवाड ,श्रीमंत माने अर्जुन सुगावे, दाजीबा काळे, मनोहर गायकवाड ,दिगंबर मारेकर यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!