कळंब – कोणत्याही देव देवतांची पूजा करण्यापेक्षा आई बापांना देव मानून त्यांचीच पूजा करा, त्यांची मान खाली जाणार नाही, याची काळजी घ्या.” स्वयंसिद्ध व्हा,रडा पण आणि लढा पण ” परीक्षेत मार्क कमी पडू द्या,पण आईबाप समजून घ्या,असा मौलिक सल्ला,”बाप समजून घेताना.. ” या विषयावर बोलताना प्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांनी दिला. कळंब येथे शिवसेवा तालीम संघ शिवजन्मोत्सव समिती व दोस्ती तुटायची नाय ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या,” बाप समजून घेताना..” या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांनी वास्तववादी विचार व्यक्त केले.व्याख्यानाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विचार मंचावर शिवसेवा तालीम संघाचे मार्गदर्शक बाजार समितीचे सभापती शिवाजी आप्पा कापसे,शिवजयंती समितीचे अध्यक्ष पापा काटे, युवा सेनेचे नितीन लांडगे,दोस्ती ग्रुपच्या शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक चोंदे, सचिव सतीश टोणगे,उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा.वसंत हंकारे म्हणाली की,स्वतंत्र्य दिले म्हणून मुलींनी कसे वागू नये.ज्या बापाने जीवा पाड जपले,त्याची बदनामी करून जाणार आहेस का..? असा प्रश्नही त्यांनी मुलींना विचारला ! बाप हा देव माणूस असतो,कोणत्याही देवाला जाण्याची गरज नाही.मायबापच देव असतात,हे सांगताना समाजात होत असल्याने अनेक प्रकारावर त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी जमलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या,पालकांच्या, उपस्थित असलेल्या सर्वांचे च डोळे पाणावले,अनेक सत्य घटना सांगून त्यांनी आत्मपरीक्षण करायला सर्वांनाच भाग पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रतिक गायकवाड,प्रास्ताविक अशोक चोंदे तर आभार सतीश टोणगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी कदम,आकाश चोंदे, विकास गडकर,मनोज कदम, स्वप्निल जोगदंड,प्रतीक वाघमारे, बालाजी कापसे,रोहित कापसे, कृष्णा कापसे,करण सावंत,शिवसेवा तालीम संघाचे सर्व सदस्य,दोस्ती तुटायची नाय ग्रुप चे बाळासाहेब धस,विठ्ठल जाधव,सुनील हूलसुलकर, दिनकर काळे,डॉ.रुपेश कवडे,सौ.सुचिता गुंजाळ,सौ.अलका टोणगे, आदींनी परिश्रम घेतले.
# बाप समजून घेताना…या विषयावरील व्याख्यानात अनेक मुली,महिला यांना अश्रू अनावर झाले.या पुढे आई वडिलांची मान खाली जाणार नाही,असे वागणार नसल्याची शपथ प्रा.वसंत हंकारे यांनी दिली.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन