August 9, 2025

व्हाइस ऑफ मिडियाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार आणि कर्तृत्वान व्यक्ती सन्मानित

  • कळंब – आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंढे काॅंप्लेक्स परळी रोड येथील सभागृहात व्हाइस ऑफ मिडियाच्या वतीने दर्पनदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन करून पुजन करण्यात आले.
    पत्रकार दिनाचे औचित्य साधून कळंब तालुक्यातील जेष्ठ पत्रकार आणि कर्तृत्वान व्यक्तींचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून जेष्ठ पत्रकार म्हणून गणेश शिंदे,माधवसिंग राजपूत,सुभाष घोडके,दिलिप झोरी,तुळशीराम चंदनशिवे तर शैक्षणिक क्षेत्रातील शरदचंद्र महाविद्यालय शिराढोण प्राचार्य डॉ.साजेद चाऊस,आदर्श मुख्याध्यापक म्हणून राजेंद्र बिक्कड,दंतरोग तज्ञ म्हणून डॉ.करिश्मा शेख यांचा शाल,पुणेरी टोपी,ट्राॅफि आणी गिफ्ट देऊन सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्हाइस ऑफ मिडिया धाराशिव जिल्हा संघटकपदी दै.धाराशिव नामाचे कळंब तालुका प्रतीनीधी रामराजे जगताप,धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी दिपक बारकुल यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करुन सन्मानित करण्यात आले तर मराठी पत्रकार संघाचे येरमाळा अध्यक्ष लहु बारकुल यांच्यासह त्यांच्या टिम सत्कार करुन सन्मानित करण्यात आले व येरमाळा येथील सेवाभावी समाजीक संस्थेने व्यायाम शाळा आणि येरमाळा येथील पत्रकार भवनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून घेतल्याबद्दल दिपक बारकुल व त्यांच्या टिम सत्कार करुन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला त्यामुळे व्हाइस ऑफ मिडिया कळंब शाखेच्या वतीने व्हाइस ऑफ मिडिया महाराष्ट्र राज्य कार्यवाह अमर चोंदे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट इंग्लिश स्कूलचे संचालक रवि नरहिरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्याय संस्थेचे सचिव विश्वनाथ (आण्णा) तोडकर आणि उद्घघाटक म्हणून व्हाइस ऑफ मिडियाचे आहिल्या नगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस ऑफ मिडिया महाराष्ट्र राज्य कार्यवाह अमर चोंदे,व्हाइस ऑफ मिडिया अहिल्या नगर(द) जिल्हाध्यक्ष गणेश खविटकर,जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे,बालाजी आडसुळ, परमेश्वर पालकर,शितल कुमार धोंगडे, महादेव महाराज आडसुळ उपस्थित होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक विश्वनाथ (आण्णा) तोडकर यांनी उपस्थीतांना शानदार असे मोलाचे मार्गदर्शन केले तसेच रवि नरहिरे,गोरक्षनाथ मदने,गणेश कविटकर,महादेव महाराज आडसुळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी व्हाईस ऑफ मिडिया धाराशिव जिल्हा संघटक रामराजे जगताप, जिल्हा उपाध्यक्ष दिपक बारकुल, तालुका उपाध्यक्ष शिवप्रसाद बियाणी, कार्याध्यक्ष रामरतन कांबळे, कोषाध्यक्ष सतीश तवले,सरचिटणीस अविनाश सावंत,तालुका डिजिटल विंगचे तालुका अध्यक्ष अमोल रणदिवे,कार्याध्यक्ष सलमान मुल्ला, साप्ताहिक विंगचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ बारगुले,अतुल मडके,दादा खतीब,हाणूमंत पाटुळे,राहुल गाडे, अनिल गाडे,व तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व व्हाईस ऑफ मिडिया तालुका शाखेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले.
    प्रस्ताविक रामरतन कांबळे यांनी केले तर सुत्रसंचलन ह.भ.प बापू जोशी तर आभार दादा खतीब यांनी मानले.

error: Content is protected !!