August 9, 2025

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेतकऱ्यांनी महा- डीबीटी पोर्टलवर अर्ज करावे

  • धाराशिव (जिमाका) – जिल्हयातील सर्व अनु.जाती व अनु.जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2023-24 अंतर्गत फुलपिक लागवड,मशरुम उत्पादन,हरीतगृह,शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग,टॅक्टर 20 एचपी, शेतकरी अभ्यास दौरा,सामुहिक शेततळे,वैयक्तीक शेततळे अस्तरीकरण,कांदाचाळ,पॅक हाऊस व प्राथमिक प्रक्रिया केंद्र इत्यादी घटकासाठी अनु.जाती प्रवर्गाकरीता
    14 लाख रुपये आणि अनु.जमाती प्रवर्गाकरिता 6 लाख 26 हजार रुपये एवढा लक्षांक प्राप्त झाला आहे. त्यानुसार शेतकऱ्याकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.
    महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login किंवा https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा.तसेच संगणक,लॅपटॉप,सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ.माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करावयाचे आहे.पोर्टलवर अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे 7/12, 8 अ,बँक पासबुक आणि आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे.
    शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर विविध घटकांसाठी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करावे.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.
error: Content is protected !!