कळंब ( माधवसिंग राजपूत ) – आपण आपला देश विकसित आहे असे सांगत आहोत परंतु ज्या देशात शिक्षण व आरोग्य विषय सुविधा मोफत मिळतात तो देश विकसित असतो.आज मोबाईलचा वाढता वापर यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय कमी होत चालली असून वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नाची गरज आहे. आता नवीन शिक्षण पद्धती येत असून समोर बसलेली शिक्षकाची ही शेवटची पिढी आहे असे विचार धाराशिव-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी कळंब येथील अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला धाराशिव जिल्हा अधिवेशन व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना व्यक्त केले. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे धाराशिव जिल्हा अधिवेशन शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर सांस्कृतीक सभागृह कळंब येथे दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाले. अधिवेशनात ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांना जीवन गौरव तसेच डी.के. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सूर्यवंशी यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार व जिल्ह्यातील १६ शिक्षक व मुख्याध्यापक यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण तज्ञ विचारवंत एम.डी देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे-पाटील, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष डॉ.बी. आर.पाटील, ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दत्तात्रय लांडगे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे,अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ. गिरीष कुलकर्णी, अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष के.व्ही.गाजरे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात पूज्य साने गुरुजी, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर, डि.के. कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली याप्रसंगी जीवन गौरव पुरस्काराने ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, कथामालेचे जिल्हाध्यक्ष कै.डि.के. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आदर्श मुख्याध्यापक म्हणून अनंतराव सूर्यवंशी यांना गौरविण्यात आले यानंतर धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्याती एक मुख्याध्यापक व एक माध्यमिक शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सपत्नीक सन्मान करण्यात आला याप्रसंगी सत्कारमूर्ती व प्रमुख पाहुणे डॉ.अशोकराव मोहेकर यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना हा पुरस्कार माझा नसून माझ्या वडिलांचा आहे मोहेकर गुरुजींचा आहे यांनी सरकारी नोकरीत न जाता ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी शिक्षण संस्था उभी केली, मोहेकर गुरुजी व साने गुरुजी यांच्या कार्यात साम्य आहे डी.के. कुलकर्णी हे आदर्श शिक्षक होते व त्यांनी जीवनभर हे काम वृत्त म्हणून केले असे सांगितले तर अनंतराव सूर्यवंशी यांनी साने गुरुजींनी जो मनोरंजन करील मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयांचे हे विचार घेऊन काम करीत असल्याचे सांगितले व ज्या आईनी शिक्षणाचे धडे दिले त्या आईच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारत आहे याबद्दल धन्यता व्यक्त केली व या पुरस्कारात शाळेतील सहकारी शिक्षकांचा मोठा वाटा आहे असे सांगितले आज समाजामध्ये नीतिमत्ता ढासळत आहे ही चिंतेची बाब आहे पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली आहे व हा पुरस्कार प्रेरणा देणार आहे असे सांगून समाजातील उपेक्षित व आर्थिक दुर्बल घटकातील मुला मुलींचे विवाह लावून दिले असून पुढे हे काम करणार असल्याचे सांगितले, डॉ.बी. आर. पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न गंभीर असून वृद्धांना कुटुंबात समाजात व शासन दरबारी ही मान मिळत नाही याची खंत व्यक्त केली व ज्येष्ठांमध्ये महिला जेष्ठ यांचे प्रश्न गंभीर आहे असे सांगितले ज्येष्ठागरीक संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी आधुनिक पिढी संस्कारा पासून दूर जात आहे, डि.के. कुलकर्णी यांनी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण व पुढे सेवानिवृत्तीनंतर समाज शिक्षणाचे काम केल्याचे सांगितले. जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक दत्तात्रेय लांडगे यांनी आपल्या भाषणात मोहेकर गुरुजी यांच्या संस्थेमधून शिक्षकांची योग्य निवड होते यामुळे गुणवंतना न्याय मिळतो असे सांगून शिक्षकांचे कुठलीही काम आडता कामा नये, शिक्षण अधिकारी म्हणून काम करीत असताना शिक्षक, मुख्याध्यापकांचे प्रश्न विनाविलंब व्हावेत यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण तज्ञ एम.डी .देशमुख यांनी आपल्या भाषणात सर्वांसाठी मी व सर्वांचा मी हा विचार घेऊन डि.के .सर यांनी काम केले आज विद्यार्थी व शिक्षक यांच्यातला संवाद हरवत चालला आहे लहानात लहान व मोठ्यात मोठे होता येणे गरजेचे आहे आमच्यात संकोच आहे यामुळे व्यक्ती विकासाच्या स्पर्धेत आम्ही मागे आहोत असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कथामालेचे जिल्हाध्यक्ष डॉ.गिरीष कुलकर्णी यांनी केले प्रमुख पाहुणे यांचे स्वागत धाराशिव जिल्हा साने गुरुजी कथामालेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष डॉ. गिरीष कुलकर्णी, कार्याध्यक्ष विक्रमसिंह देशमुख , उपाध्यक्ष प्रेमचंद देवसाळे, सल्लागार दिलीप पाटील, डी.डी. शेरे, ए.टी. माने, प्रदीप यादव यांनी तर सूत्रसंचालन प्राचार्य काकासाहेब मुंडे,प्राचार्य महादेव गपाट यांनी केले तर आभार सोपान पवार यांनी मानले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन