August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.22 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 69 कारवाया करुन 41,900 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • शिराढोण पोलीस ठाणे:आरोपी नामे-श्रीकांत माणिक पाटील, रा. पिंपरी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.22.12.2024 रोजी 12.45 वा. सु. पिंपरी ते बोरगाव जाणारे रोडलगत निसर्ग हॉटेलच्या पाठीमागे अंदाजे 525 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-मोईन उर्फ बबलू मुन्शी कुरेशी, वय 29 वर्षे, रा. शिराढोण ता. कळंब जि.धाराशिव हे दि.22.12.2024 रोजी 14.30 वा. सु.कळंब लातुर रोडलगत रांजणी कारखाना चौक येथे अंदाजे 1,925 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 50 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये शिराढोण पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • वाशी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.21.12.2024 रोजी 11.30 वा. सु. पो ठाणे वाशी हद्दीतील वाशी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-रोहीत उर्फ सोमनाथ फुलचंद घुले, वय 26 वर्षे, रा.शिवशक्तीनगर, वाशी ता. वाशी जि. धाराशिव हे 11.30 वा. सु. वाशी येथे सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 510 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले वाशी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • भुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.22.12.2024 रोजी 17.30 वा. सु. पो ठाणे भुम हद्दीत नगर परिषद भुम येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-गणेश रगंनाथ पवार, वय 35 वर्षे, रा.कल्याण नगर, पारधी पिढी, भुम ता. भुम जि. धाराशिव हे 17.30 वा. सु.नगर परिषद भुम येथे सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 400 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले भुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
    तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-शिवराज रेवणसिध्द लोकरे, वय 42 वर्षे, तुळशीराम बापुराव लोकरे, वय 25 वर्षे, रा.वडगाव काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.12.2024 रोजी 05.00 वा. सु. तुळजापुर ते लातुर जाणारे रोडवर काक्रंबा शिवारात भारत पेट्रोल पंपाचे समोर आप आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप क्र एमएच 13 सीयु 0386 व बोलेरो पिकअप क्र एमएच 13 ए.एक्स 7048 या वाहना मध्ये 2 जर्शी गायी, 2बैल, 2 हालगट,3 कालवड, असे एकुण 85,000 ₹ किंमतीचे जनावरे पिकअप मध्ये दाटीवाटीने बांधून जनावरांना निर्दयतेने वागणुक देवून त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करत असताना तुळजापूर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1)(अ), 11(1)(बी), 11(1) (एच) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
    तामलवाडी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-भगवान रामा शिंदे, वय 27 वर्षे, रा. भिमनगर, शेळगी ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांची अंदाजे 50,000 ₹ किंमतीची हिरो होंडा स्पेलंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 13 डी. एक्स 9069 चेसी नंबर-MBLHAW177N5F55894,इंजिन नं-HA11EAN5F31796 ही दि.20.12.2024 रोजी 14.00 ते 16.00 वा. सु. दावत मलीक दर्गाच्या पाठीमागीलबाजूस खडकी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भगवान शिंदे यांनी दि.22.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
    वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-इनुस वजीर शेख, वय 60 वर्षे, रा. गिरवली शिवार पारगाव टोलनाक्याजवळ ता. भुम जि. धाराशिव यांचा अंदाजे 30,000 ₹ किंमतीचा गावराण बैल हा दि.22.12.2024 रोजी 03.00 ते 05.00 वा. सु. इनुस शेख यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-इनुस शेख यांनी दि.22.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • वाशी पोलीस ठाणे: मयत नामे-उत्तम सुर्यभान सलगर, वय 72 वर्षे, व सोबत गोरख उर्फ पांडुरंग उत्तम सलगर, वय 35 वर्षे, रा.वनगरवाडी ता.वाशी जि. धाराशिव हे दोघे दि.22.12.2024 रोजी 14.45 वा.सु.वाशी ते वाशी फाटा रोवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए. झेड. 3388 वारुन जात होते दरम्यान पाण्याचे टाकी जवळ वाशी शिवार येथे काळ्या रंगाची फॉर्च्यूनर कार क्रमांक एमएच 12 जी. पी. 3600 चालक आरोपी नामे सिध्देश्वर निवृत्ती भालेकर, रा. केळेवाडी ता. वाशी जि. धाराशिव यानी त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून उत्तम सलगर यांचे गाडीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात उत्तम सलगर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर गोरख सलगर हे किरकोळ व गंभीर जखमी झाले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आण्णासाहेब दादाहरी सलगर, रा. वनगरवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.22.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(ए), 125(बी), 106(1) सह 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

    जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस

error: Content is protected !!