कळंब – सुजाउद्दीन बद्रुद्दिन शेख यांच्या स्मरणार्थ आयोजित महासराव नवोदय पूर्व परीक्षा रविवार,दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी कळंब येथे उत्साहात संपन्न झाली.या परीक्षेसाठी जिल्ह्यातील तसेच कळंब तालुक्याच्या लगतच्या इतर तालुक्यांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही सराव परीक्षा राजेंद्र पवार, सिराज,सुरवसे,अचीव्हर कोचिंग क्लासेसचे सहशिक्षक लोमटे आणि विजन ग्रुप ऑफ एज्युकेशन यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. या प्रसंगी डॉ.संजय कांबळे, अनिसोद्दीन बद्रुद्दिन,कलीम भाई तांबोळी,प्रा.जालिंदर लोहकरे आणि वलियोद्दीन भाई यांची मान्यवर उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा देण्याच्या उद्देशाने ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले तसेच आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक,आयोजक आणि सहकाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले