August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.21डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 224 कारवाया करुन 2,68,700 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • ढोकी पोलीस ठाणे:आरोपी नामे-सिताबाई गणा काळे, वय 55 वर्षे, रा. जयभिमनगर, ढोकी ता. जि. धाराशिव या दि.21.12.2024 रोजी 17.35 वा. सु. तेरणा साखर कारखाना उस वाहतुक परिसरात ढोकी येथे अंदाजे 2,500 ₹ किंमतीची 25 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-तानाबाई नारायण पवार, वय 54 वर्षे, रा. डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव या दि.21.12.2024 रोजी 17.25 वा. सु. डिकसळ गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 5,600 ₹ किंमतीची 160 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-शितल राहुल पवार, वय 28 वर्षे, रा. जुनी दुध डेअरी कळंब ता. कळंब जि.धाराशिव या दि.21.12.2024 रोजी 18.30 वा. सु.जुनी दुध डेअरी जवळ मोकळ्या जागेत कळंब येथे अंदाजे 5,600 ₹ किंमतीची 70 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-गीताबाई सुभाष काळे, वय 44 वर्षे, रा.मस्सा खं ता. कळंब जि.धाराशिव या दि.21.12.2024 रोजी 18.00 वा. सु. मस्सा खं. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,500 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
  • स्थानिक गुन्हे शाखा:आरोपी नामे-रेखा प्रकाश शिंदे, वय 24 वर्षे, रा. सोन्नेवाडी शिवार ता. भुम जि. धाराशिव या दि.21.12.2024 रोजी 13.30 वा. सु. सोन्नेवाडी शिवारात आपल्या राहत्या पत्र्याचे शेडसमोर येथे अंदाजे 13,000 ₹ किंमतीची 200 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव, 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे:आरोपी नामे-नागीन रवी काळे, वय 27 वर्षे, रा. साठेनगर, धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.21.12.2024 रोजी 18.30 वा. सु.आपल्या राहते घराचे बाजूला अंदाजे 1,200 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • वाशी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.21.12.2024 रोजी 14.10 वा. सु. पो ठाणे वाशी हद्दीतील अंजनसोंडा येथे चहाचे हॉटेलमध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-लतीफ अन्व्र पठाण, वय 55 वर्षे, रा.अंजनसोंडा ता. भुम जि. धाराशिव हे 14.10 वा. सु. अंजनसोंडा येथे चहाचे हॉटेलमध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 680 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले वाशी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • स्थानिक गुन्हे शाखा :जुगार विरोधी कारवाई दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी दि.21.12.2024 रोजी 115.20 ते 15.40 वा. सु. पो ठाणे ढोकी व उमरगा हद्दीत छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-राजेंद्र दादाराव ढवारे, वय 58 वर्षे, रा.ढोकी ता. जि. धाराशिव हे 15.40 वा. सु. पेट्रोल पंप चौक ढोकी येथे बाजूला कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,950 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले स्थानिक गून्हे शाखेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-राजु बाबुराव देशमुख, वय 48 वर्षे, रा.गुंजोटी ता. उमरगा ता. जि. धाराशिव हे 15.20 वा. सु. याटे कॉम्पलेक्स समोर उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,800 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले स्थानिक गून्हे शाखेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये संबंधीत पो ठाणे येथे स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.
  • भुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.21.12.2024 रोजी 13.00ते 18.45 वा. सु. पो ठाणे भुम हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-मुको गोवर्धन काळे, वय 40 वर्षे, रा.निखील नगर, भुम ता. भुम जि. धाराशिव हे 13.00 वा. सु. आलमप्रभु रोड वरील तानाजी शिंदे यांचे भंगार दुकानाचे बाजूस सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 410 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले भुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. आरोपी नामे-शारुख हबीब शेख, वय 25 वर्षे, रा.गरडागल्ली भुम ता. भुम जि. धाराशिव हे 18.45 वा. सु. नगर परिषद भुम समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 800 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले भुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.21.12.2024 रोजी 19.30 वा. सु. पो ठाणे धाराशिव शहर हद्दीतील चहा हॉटेल सेंन्टर बाजूला धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-राहुल जालींदर जाधव, वय 30 वर्षे, रा. इंगळेगल्ली, धाराशिव जि. धाराशिव हे 19.30 वा. सु. चहा हॉटेल सेंन्टर बाजूला धाराशिव येथे मिलन नाईट मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 260 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-अशोक चंद्रकांत बाराते, वय 42 वर्षे, रा.नागोबा गल्ली, भुम ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.21.12.2024 रोजी 00.05 वा. सु. तेरखेडा ब्रीज जवळ सर्विस रोडवर तेरखेडा कडून येरमाळा येणारे एनएच 52 रोडवर अशोक लेयलॅन्ड दोस्त क्र एमएच 25 एजे 2788 या वाहना मध्ये 16गायी व वासरे वाहनासह 2,83,000₹ किंमतीचे जनावरे दाटीवाटीने तोंडाला व पायाला बांधून जनावरांना निर्दयतेने वागणुक देवून त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता गोवंशीय जनावरांचे कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करत असताना येरमाळा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 3(11), (डी),(एफ),(एच), (के) सह प्राणी संरक्षण कायदा कलम 5,5(अ),(1) (2), 5(ब) सह कलम 119 मपोका सह मोवाका कलम 83, 177 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बलभिम बळीराम घोडके,वय 57 वर्षे, रा. रामनगर, शिवपुरी रोड, उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 15,000 ₹ किंमतीची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.क्यु 7933 ही दि.26.11.2024 रोजी 19.30 ते 19.50 वा. सु. बसस्थानक मधील जालु टी. हाउसच्या जवळ रोडच्या बाजूला उमरगा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बलभिम घोडके यांनी दि.21.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे: मयत नामे-शिला जीवन आडसुळ, वय 52 वर्षे, रा.शिवनेरीनगर, सांजा रोड, धाराशिव ता.जि. धाराशिव या दि.03.12.2024 रोजी 12.45 वा.सु.एनएच 52 रोडवर उंबरे यांचे पेट्रोलपंप समोर सांजा चौकाकडे जाणारे रोडवर धाराशिव येथुन स्कुटी क्र एमएच 25 ए. वाय. 8030 वारुन जात होत्या दरम्यान मारुती सुझुकी कार क्रमांक एमएच 25 ए.एल 1591 चा चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून ओव्हरटेक करण्याचे नादात शिला आडसुळ यांचे गाडीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात शिला आडसुळ या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. तसेच नमुद कार चालक हा अपघाताची माहिती न देता व जखमीस उपचार कामी न नेता पसार झाला. आमृ नं 54/24 मध्ये फिर्यादी नामे-मिमोह जीवन आडसुळ, वय 34 वर्षे, रा. शिवनेरीनगर, सांजा रोड, धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.21.12.2024 रोद्व जी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(ए), 125(बी), 106(1) सह 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!