धाराशिव – (जिमाका) सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत व पोलीस अधिक्षक,अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत २० डिसेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये तसेच माजी सैनिक व देशभक्त नागरिकांच्या माहितीसाठी दरवर्षी ७ डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलनाबाबत मान्यवरांचा सत्कार,वीर पत्नी,वीर माता,वीरपिता यांचा सत्कार तसेच माजी सैनिकांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप, विशेष गौरव पुरस्कार प्राप्त पाल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हातील माजी सैनिक,वीरपत्नी, वीरमाता,वीरपिता व त्यांचे अवलंबित यांनी या राष्ट्रीय कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धाराशिव यांनी केले आहे .
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला