August 9, 2025

परभणी येथील संविधान शिल्पाची तोडफोड निषेधार्थ कळंब कडकडीत बंद

  • कळंब ( साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – परभणी येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील भारतीय संविधानाच्या शिल्पाची मोडतोड करण्यात आली.या घटनेचे महाराष्ट्र राज्यात तीव्र पडसाद उमटत असून दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी कळंब येथील संविधान प्रेमी व आंबेडकरी जनतेच्या वतीने कळंब बंदची हाक देण्यात आली होती.याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून कळंब येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यापारी दुकाने, हॉटेल पान टपरी भाजीपाला विक्रेते,शाळा महाविद्यालय बंद होती.या घटनेचा तीव्र निषेध करीत सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून कळंब उपविभागीय कार्यालयावर मोर्चा निघाला. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी भारतीय संविधानाचा काही लोक अपमान करीत असून याला पायबंद न घातल्यास आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला असून परभणी येथे घडलेल्या या घटनेचा निषेध करणाऱ्या आंबेडकरी जनतेवर शासन व पोलीस प्रशासनच्या वतीने कोंबिंग ऑपरेशनद्वारे अटक केली जात आहे हे अटक सत्र ताबडतोब थांबवावे अशी मागणी करण्यात आली.
    या मोर्चात कळंब शहर व परिसरातील लोकांची मोठी उपस्थिती होती.
error: Content is protected !!