कळंब – लिंबगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथील बाळू घुगे व रंजीत ससाणे या दोन मातंग समाजातील मुलांना आठ ते दहा वॉचमन यांनी जातीवाचक शिवीगाळ करत त्यांचे कपडे काढून त्यांना नग्न करून लाठी, काठीने बेदम मारहाण केली व जातिवाचक शिवीगाळ केली. या घटनेचा कळंब येथे बहुजन जनता पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून संबंधित गुन्हेगार वॉचमन यांना अटक करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करावेत अशी मागणी बहुजन जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली असून याविषयीची निवेदन ,कळंब तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार गोपाल तापडिया यांनी स्वीकारले.या निवेदनावर धाराशिव जिल्हा बहुजन जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ भंडारे,तालुकाध्यक्ष अश्रुबा शिंदे,श्रमिक मानव विकास आघाडीच्या माया शिंदे,कामगार आघाडीचे सुनील ताटे,ईश्वर ताटे, शंकर ताटे,सुनील गायकवाड, सतीश ताटे यांच्यासह सह्या आहेत.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन