धाराशिव – राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील विविध क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक कमावलेल्या ८४ खेळाडूंचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षक यांचा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या वतीने गुरुवारी (दि.१२) सत्कार करण्यात आला. शहरातील राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,खेळाडूंना मार्गदर्शन करणारे खो-खो चे मार्गदर्शक प्रविण बागल,विवेक कापसे,कबड्डी मार्गदर्शक अमितकुमार लोमटे यांच्यासह अँड. प्रवीण शिंदे.भोरे,बालाजी डोंगे,इकबाल पटेल,अनिल जाधव,गणपत चव्हाण,अमर गुंड,गणेश गडकर,बबनराव वाकुरे, सोमनाथ उंबरे,गणेश धाबेकर,राहुल धाबेकर,अक्षय धाबेकर,शुभम बडगणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी धुळे येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पधेर्तील विजयी संघामधील प्रणाली काळे,सुहानी धोत्रे,स्नेहा पवार, श्वेता भोसले,अश्विनी शिंदे,तनवी भोसले,मुग्धा वीर,सृष्टी सुतार, मैथिली पवार,दुर्गा भोसले, आहाना नाईकनवरे,आसना शेख,तसेच रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावलेल्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघातील सिद्धी भोसले, राही पाटील,ईश्वरी सुतार, सलोनी गांगुर्डे,स्वप्नाली काळे, श्रावणी गुंड,केतकी सोडगीर, वैष्णवी पांचाळ,कृष्णावली कवडे, सानिका घोडके,शर्वरी क्षिरसागर, समृद्धी कुलवानकर यांचा समावेश आहे.तसेच बुलढाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या १९ वर्षे वयोगटातील राज जाधव,जितेंद्र वसावे,आराध्या गोसावी,सोन्या वळवी,विलास वळवी, नितेश वळवी,विशाल वळवी,आदित्य गवळी,साईप्रसाद कोटे,संदीप ढोकळे यांचा समावेश आहे. तसेच चिपळूण येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेतील उपविजेता संघातील १४ वर्षाखाली मुलांमध्ये भीमसेन वसावे, धरमसिंग वसावे, युवराज पाडवी, प्रफुल्ल वसावे, सुरेश वसावे, शंभूराजे इंगळे, ओम पवार, आदित्य पांचाळ, श्लोक पुरी, प्रज्वल शिंदे आदी खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी