कळंब – बांगलादेश होणारे हिंदूवरील अत्याचार थांबवावेत या मागणीसाठी कळंब येथे सकल हिंदू समाजाने जागतीक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधत ‘न्याय यात्रा’ काढली. यावेळी बांगलादेशात होणार्या हिंदूवरील अत्याचाराकडे लक्ष वेधणारे फलक हाती घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. कळंब येथे सकल हिंदू समाजाने बांगलादेशात होणार्या हिंदूवरील अत्याचारांच्या निषेधार्थ मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून मंगळवारी न्याय यात्रा रॅलीचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर दाखल झाली. बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला आहे.यामध्ये हिंदू समाजाला लक्ष केले जात असून हिंदूधर्मीय नागरिकावर अमानुष अत्याचार केले जात आहेत.हे अत्याचार तात्काळ थांबवावे यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे अशी मागणी यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानाकडे करण्यात आली. यावेळी बांगलादेश प्रकरणावर लक्ष केंद्रीत करणारे विविध फलक हाती घेवून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहचली,तद्नंतर निवेदन देवून सांगता करण्यात आली. यावेळी दिलेल्या निवेदनावर प्रकाश भडंगे,मकरंद पाटील, अनिल यादव,सतपाल बनसोडे,विश्वंभर पाटील,अँड,शकुंतला फाटक,शितल चोंदे,दिलीप लोढा,विष्णू बारगुले,चत्रभुज भांडे,संदीप कोकाटे,शंभु कोकीळ,परशुराम देशमाने, शिवराज पाटील धनेगावकर, अजित गुरव,महेश जोशी,संतोष भांडे,संजय जाधवर,किरण फल्ले,अशोक क्षीरसागर,नाना शिंगणापूरे,बंडू गंभिरे,सचिन क्षिरसागर यांच्या सह्या आहेत.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात