August 9, 2025

परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पाथर्डी येथे अभिवादन

  • कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी शाळेमध्ये महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्ञानाचा अथांग महासागर दिन दलितांचे शोषितांचे न्यायकर्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी प्रथम शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला. मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक धनंजय गव्हाणे, मनीषा पवार,सरोजिनी पोते आदींनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!