August 9, 2025

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना माळकरंजा येथे अभिवादन

  • कळंब – तालुक्यातील माळकरंजा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत दि.६ डिसेंबर २०२४ रोजी महापरिनिर्वाण दिनी कायदेपंडित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    इयत्ता सहाव्या वर्गातील मुलांनी मराठी विषयातील पाठ बाल सभा हा यावेळी प्रात्यक्षिक स्वरूपात सादरीकरण केले आणि क्रांती सुर्याच्या जीवनातील विविध प्रसंग सांगुन संपूर्ण जीवन पट उलगडून दाखवला.शाळेतील विद्यार्थीनी कु.सुप्रिया सतीश मोरे हिने सुत्रसंचालन करताना प्रज्ञा रत्न बाबासाहेब यांच्या बद्दल शेरोशायरी करत कार्यक्रमात रंगत आणली.आकांक्षा मुळे, इश्वरी मुळे,सत्यजित क्षिरसागर, यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील प्रसंग सांगितला तर श्लोक मोरे आणि राज धोंगडे यांनी गीताच्या माध्यमातून बाबासाहेब व्यक्त केले.शाळेतील शिक्षक संजय ओव्हाळ,हनुमंत घाडगे,श्रीमती भारती सुर्यवंशी व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कु. मंजुश्री कराड यांनी आपले विचार व्यक्त केले.
    शाळेचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष भोजने यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध गुणांचा उहापोह करून प्रत्येक विद्यार्थ्यांने बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुणांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.चि.मंदार मनोज माळी याने आभार मानले.
error: Content is protected !!