August 9, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना वंदन

    • कळंब – निजाम काळात बहुजन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी अतुलनीय योगदान देणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी सन १९५१ साली शिक्षणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकले. त्यांच्या दूरदृष्टी आणि प्रेरणादायी नेतृत्वामुळे शैक्षणिक शाळा आणि महाविद्यालये स्थापन करण्यात आली,ज्यामुळे बहुजन समाजातील असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी मिळाली.
      ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे संस्थापक,अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या या प्रयत्नांमुळे केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतही सुधारणा झाली.त्यांच्या कार्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून समाजात नवीन दिशा निर्माण झाली आणि हजारो कुटुंबांचे जीवनमान उंचावले गेले.
      आजच्या काळातही त्यांचा वारसा प्रेरणादायी ठरतो आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समताधिष्ठित समाजाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी उभारलेली शैक्षणिक व्यवस्था ही राज्याच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरली आहे.
      दि.५ डिसेंबर २०२४ वार गुरुवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने ज्ञान प्रसारक मंडळ संचलित मराठवाडयातील विविध शाळा,महाविद्यालयात शिक्षणमहर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    • १) शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब
      शहरातील शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील पुतळ्यास सेवानिवृत्त प्रा.बापू मेटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
      याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,प्राचार्य डॉ.सुनील पवार,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
    • २) ज्ञानद्योग माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा
    • कळंब तालुक्यातील मोहा येथील ज्ञानद्योग माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयातील कार्यालयात शिक्षण महर्षी कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस ज्ञान प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्राचार्य संजय जगताप व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
    • ३) जय भवानी विद्यालय,पारा
    • जय भवानी विद्यालय,पारा येथील कार्यालयात शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक एन.बी सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रशालेचे सहशिक्षक भराटे एस.डी,श्रीम मेटे एस.व्ही, वाघमारे एस.झेड,मुरकुटे डी.व्ही, माळी व्ही.एस,बांगर ए.बी,मुळे डी.एस,गवळी ए.एम,डंबरे तुषार तसेच विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.
    •  
  • ४) विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर,कळंब
    शहरातील विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथील कार्यालयात शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    यावेळी सहशिक्षक व्ही.एन.मोरे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
  • ५) विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा
    भूम तालुक्यातील विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी हायस्कूल मधील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थित होती.
  • ६) संभाजी विद्यालय पिंपळगाव (लिंगी) –
    वाशी तालुक्यातील संभाजी विद्यालय पिंपळगाव (लिंगी) येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
  • ७) ज्ञानोद्योग माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय,येरमाळा
    विद्यालयातील कार्यालयात शिक्षणमहर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस प्राचार्य शिवाजी पौळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!