धाराशिव (जिमाका)- पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्हयात मंजूर असलेल्या २२ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि ५ हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांचे रुग्णालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. शहरी आरोग्यविर्धीनी केंद्राची पुर्वीची वेळ ही दुपारी २ ते रात्री १० वाजतापर्यंत होती.आता सुधारित वेळ ही दुपारी १२ ते रात्री ८ वाजतापर्यंत असणार आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाची पुर्वीची वेळ ही दुपारी २ ते रात्री १० वाजतापर्यंत होती.आता सुधारित वेळ ही दुपारी १२ ते रात्री ८ वाजतापर्यंत असणार आहे. वरील सुधारीत वेळापत्रक ९ डिसेंबर २०२४ पासुन लागू करण्यात येणार आहे.जिल्हयातील नागरिकांनी व रुग्णांनी याची नोंद घ्यावी.असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीचे सदस्य सचिव डॉ.सतीश हरिदास यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी