August 9, 2025

शाळेच्या मस्टरवरील सह्या बंद केल्याने पती-पत्नीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

  • धाराशिव – आश्रम शाळेवर अधीक्षक म्हणून व त्यात शाळेवर प्रयोगशाळा परिचर या पदांवर शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या पती-पत्नी या संस्थाचालक मुख्याध्यापक व जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगणमत करून त्यांच्या नियमबाह्य पद्धतीने मस्टरवरील सह्या बंद केलेल्या आहेत. त्यामुळे त्या पती-पत्नीने न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून आजचा ६ वा दिवस आहे. विशेष म्हणजे पत्नी सुवर्णा यांची प्रकृती खालावली असून त्या उपोषण स्थळीच हीव भरविणाऱ्या थंडीत अंथरुणावर खिळलेल्या आहेत.मात्र अधिकाऱ्यांना या समस्येकडे पाहण्यास वेळ देखील नाही.
    तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रम शाळेत योगेंद्र भीमसिंग गिरासे हे अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.मात्र त्यांना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजेरी मस्टरवरील दि.१८ ऑक्टोबर २०२३ पासून सह्या घेणे व २०२०- २१ पासून वेतन थांबवलेले आहे.विशेष म्हणजे सोलापूर येथील शाळा न्यायाधिकरणच्या पिठासन अधिकाऱ्यांनी दि.२ मे २०२४ व दि.९ ऑक्टोबर २०२४ रोजी रुजू करून घेण्याचे व सह्या करण्याचे आदेश दिलेले आहेत.मात्र अद्यापपर्यंत त्यांना सह्या करु दिलेल्या नाहीत. तसेच त्यांची पत्नी सुवर्णा दिलीपसिंग राजपूत या देखील त्याच शाळेवर प्रयोगशाळा परिचर म्हणून दि.१३ ऑगस्ट २०२१ पासून कार्यरत आहेत. त्यांच्या देखील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी हजेरी मस्टरवरील सह्या दि.१ एप्रिल २०२४ पासून बंद केलेल्या आहेत. तसेच सोलापूर येथील शाळा न्यायाधिकरणच्या पिठासीन अधिकाऱ्यांनी दि.२ मे २०२४ व दि.९ ऑक्टोबर २०२४ च्या आदेशाला अनुसरून रुजू करून घेणे आवश्यक होते. मात्र संबंधित आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही पती-पत्नीच्या सह्या घेतलेल्या नाहीत. तसेच त्यांचे वेतन देखील दिलेले नाही. त्यामुळे आम्हाला न्याय द्यावा या मागणीसाठी त्या पती-पत्नींनी चिमुकल्यासह आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र चिमुरड्याची देखील प्रकृती खालावल्याने त्याला इतरत्र हलविण्यात आले आहे.तर उपोषणकर्त्या सुवर्णा राजपूत यांची देखील प्रकृती खालावली असून त्या कुपोषण स्थळीच अंथुरणावर खिळलेल्या आहेत.
    महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनिमय अधिनियम १९७७ मधील कलम ५ (२) नुसार कायमस्वरूपी रिक्त असलेल्या पदावर एखादा कर्मचारी परिविक्षाधीन कालावधीसाठी २ वर्षे नियुक्त केल्यास परिविक्षाधीन कालावधी संपताच तो कर्मचारी स्थायी कर्मचारी म्हणून समजला जाईल व महाराष्ट्र खाजगी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम २८ च्या तरतुदीनुसार प्रशासकीय सचोटी अवलंबून वेतन अदा करण्याचे आदेश व्हावा. त्यामुळे जीवन जगण्यासाठी आर्थिक तरतूद होईल,अशी त्यांची मागणी आहे.
error: Content is protected !!