धाराशिव (जिमाका) – शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे,विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि धोरणात्मक सुधारणा करण्यासाठी एन.सी.ई.आर.टी.या राष्ट्रीय शैक्षणिक संस्थेअंतर्गत नवीन शैक्षणिक धोरण – २०२० नुसार स्थापन झालेल्या PARAKH (performance assessment review and analysis of knowledge for holiestic development) या संस्थेमार्फत संपूर्ण देशामध्ये ७८२ जिल्ह्यांमधील ८८ हजारपेक्षा जास्त निवडक शाळांतील २३ लक्षपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे परख राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण २०२४ चे आयोजन ४ डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधीत तिसरीच्या ४३, सहावीच्या ४२ व नववीच्या ४९ अशा एकूण -१२० शाळांमधील १३४ वर्गातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे.या सर्वेक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल. इयत्ता ३ री आणि ६ वी साठी भाषा, गणित आणि पर्यावरण अभ्यास हे विषय तर इयत्ता ९ वी साठी भाषा, गणित,सामाजिक शास्त्र आणि विज्ञान विषयांसाठी सर्वेक्षण चाचणी होणार आहे. सर्वेक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,धाराशिवचे डॉ. प्राचार्य दयानंद जटनुरे व शिक्षणाधिकारी,(प्राथमिक) अशोक पाटील हे जिल्हा समन्वयक व संस्थेतील मूल्यमापन विभाग प्रमुख प्रा.डॉ.शोभा मिसाळ व प्रा.श्री.मिलिंद अघोर हे जिल्हा सहाय्यक समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी क्षत्रिय अन्वेषक (fild investigator) व निरीक्षक (observer यांची नेमणूक करण्यात आली आहे.यासाठी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष परख सर्वेक्षण घेणाऱ्या क्षत्रिय अन्वेषकांची २९ नोव्हेंबर २०२४ रोजी परख सर्वेक्षण ज्या शाळेमध्ये होणार आहे,त्या शाळेतीत मुख्याध्यापकांची मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. या सर्वेक्षणात ४ डिसेंबर २०२४ रोजी इयत्ता ३ री व ६ वी साठी सकाळी ११ ते १२ : ३० या वेळेत तर इयत्ता ९ वी साठी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत संपादनूक चाचणी भरून घेतली जाणार आहे.तसेच शिक्षकांकडून शिक्षक प्रश्नावली (Teacher Questionaey) व मुख्याध्यापकांकडून शाळा प्रश्नावली (School Questionary) भरून घेतली जाणार आहे.सर्वेक्षणामार्फत जिल्हा,राज्य व देशाचे शैक्षणिक आरोग्य लक्षात येणार असून पुढील प्रगतीसाठी आवश्यक सूचना तयार करण्यात येणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात परख राष्ट्रीय सर्वेक्षण -२०२४ करीता मूल्यांकन करण्याकरिता इयत्तानिहाय व तालुकानिहाय शाळा संख्या पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.धाराशिव जिल्हा -१३४ शाळा, एकूण क्षेत्रीय अन्वेषक संख्या- १७७,यामध्ये इयत्ता ३ री ४३,क्षेत्रीय अन्वेषक-८६, इयत्ता ६ वी ४२,क्षेत्रीय अन्वेषक-४२, इयत्ता ९ वी अशा एकूण १३४ वर्गाचा समावेश आहे. धाराशिव तालुका-एकूण ३६ शाळा यामध्ये इयत्ता ३ री १५,इयत्ता ६ वी ६,इयत्ता ९ वी-१५ एकूण क्षेत्रीय अन्वेषक -५१, तुळजापूर तालुका – एकूण २२ शाळा. इयत्ता-३ री-६, इयत्ता-६ वी-८, इयत्ता ९वी -८, एकूण क्षेत्रीय अन्वेषक-२८,उमरगा तालुका-एकूण २९ शाळा, इयत्ता-३ री-८, इयत्ता-६ वी -१०,इयत्ता ९ वी -११ एकूण क्षेत्रीय अन्वेषक – ३७ इतकी आहे. वाशी तालुका-एकूण -३ शाळा, इयत्ता-३ री-१,इयत्ता -६ वी -१,इयत्ता ९ वी -१,एकूण क्षेत्रीय अन्वेषक- ४ लोहारा तालुका-एकूण ८ शाळा,इयत्ता-३ री-३, इयत्ता-६ वी-३,इयत्ता ९ वी-२,एकूण क्षेत्रीय अन्वेषक संख्या-११ आहे.भूम तालुका एकूण -१३ शाळा,इयत्ता ३ री-३,इयत्ता-६ वी-६,इयत्ता ९ वी -४ एकूण क्षेत्रीय अन्वेषक संख्या -१६ आहे. कळंब तालुका-एकूण – १२ शाळा,इयत्ता-३ री-५, इयत्ता-६ वी -४,इयत्ता ९ वी -३ एकूण क्षेत्रीय अन्वेषक संख्या-१७ आहे.परंडा तालुका-एकूण -११ शाळा, इयत्ता-३ री-२,इयत्ता-६ वी -४, इयत्ता ९ वी -५ एकूण क्षेत्रीय अन्वेषक संख्या-१३ असे आहेत. धाराशिव तालुका- ३६,तुळजापूर तालुका- २२,उमरगा तालुका- २९, वाशी तालुका- ३,लोहारा तालुका – ८,भूम तालुका- १३,कळंब तालुका- १२,परंडा तालुका- ११,एकूण १३४ शाळातील इयत्ता ३,इयत्ता ६ वी आणि इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांचे परख सर्वेक्षणातून त्यांच्या क्षमतांचे मूल्यांकन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिवचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे यांनी दिली.
More Stories
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन