संभाजी नगर – भारतीय राज्य घटनेवर चारी बाजूने होणारे हल्ले फक्त शेतकरी व कष्टकऱ्यांच्या भक्कम एकजुटीनेच थांबू शकतात असे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या साथी मेधा पाटकर यांनी केले. डॉ.बाबा आढाव यांना त्यांचे आत्मक्लेश आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गांधी भवन येथे बसलेल्या शेतकरी व कष्टकऱ्या समोर त्या बोलत होत्या. बाबांचे उपोषणास पाठिंबा देणाऱ्यात प्रामुख्याने हमाल कश्टकरी,ग्रामीण कष्टकरी, कचरा कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सत्ताधाऱ्यांकडून संविधानावर असेच हल्ले होत राहिल्यास शेतकरी व कष्टकऱ्यांना जेलभरो आंदोलनाची तयारी करावी लागेल असा इशारा,महारष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी दिला. स्वातंत्र्या नंतर मिळालेल्या संविधानाने शेतकरी, कष्टकर्याबरोबरच दलीत – आदिवासी व महिलांचे जीवनात आशेचा किरण दिसत असतांनाच संविधावर सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी जाहीररीत्या हल्ले करीत असतांना,पंतप्रधान बघ्याची भूमिका घेतात,हे अचंबित करणारे वर्तन असून,त्यामुळे संविधान विरोधकांना बळ मिळते,हे वास्तव असल्याच्या भावना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केल्या चे पत्रकात नमूद केले आहे.त्यात ज्ञानप्रकाश मोदानी , डॉ.सुधीर देशमुख,अँड.सुभाष सावंगीकर,प्रा.मच्छिंद्र गोरडे, अँड.वैशाली डोळस,अँड.रमेश भाई खंडागळे,साथी बळवंत मोरे,अनंत भवरे,के.ई.हरिदास, प्रा.श्रीराम जाधव इ.चा समावेश होता. यावेळी साथी अण्णा खंदारे, प्रा.वासुदेव मुलाटे, प्रा.देसरडा,अँड. घोरपडे,कैलास तवार, प्रा.भारत शिरसाट,साथी भाऊसाहेब पठाडे, प्रा.शोभा शिराढोणकर, अँड.लतिका राजपूत,साथी तारा मराठा,तारा जाधव,साथी देविदास किर्तीशाही,साथी प्रवीण सरकटे, साथी जगन भोजने,कॉ. भगवान भोजने,कल्याण दुगले, बबन काकडे इ चा प्रमुख सहभाग होता.
More Stories
ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम- रुपाली चाकणकर
सस्ती अदालत उपक्रमातून 560 शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे
हमाल कष्टकऱ्यांच्या बाईक रॅली ने केले शहरात जनजागरण