August 9, 2025

बाबासाहेबांनीच जगण्याचा अधिकार दिला – प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी

  • कळंब – जगातील ६५ पेक्षा अधिक देशांमध्ये प्रतीवर्षी १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते.समाजात समता, न्याय व बंधुता ही मूल्ये रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देऊन, शिक्षणाचे महत्त्व पटवून देत वंचित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.त्यांनी शैक्षणिक,सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक,आर्थिक,शेतीविषयक आणि महिलाविषयक अशा सर्वच क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत
    विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे प्रतिपादन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
    शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंतीनिमित्ताने डॉ.अशोक मोहेकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
    यावेळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य यावर प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी हे बोलत होते.
    यावेळी उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान,सा.साक्षी पावणज्योत उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव,प्रा.बोंदर,संतोष मोरे,अर्जुन वाघमारे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!