August 9, 2025

शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त अभिवादन

  • कळंब (माधवसिंग राजपूत ) – कळंब येथील संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे दिनांक 23 मार्च रोजी शहीद दिन निमित्त ज्येष्ठ विधीज्ञ त्र्यंबकराव मनगिरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या निमित्त उपस्थित मान्यवरांनी क्रांतिकारक शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करू अभिवादन केले याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ ,महाराष्ट्र पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक प्रदेश सचिव सुफी शमशोद्दीन सय्यद, स्वराज ग्रुपचे तालुकाध्यक्ष माधव सिंग राजपूत ,ज्ञानदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बंडू ताटे, प्राचार्य महादेव गपाट सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघमारे ,संत बोधले महाराज माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक प्रदीप यादव यांनी विचार व्यक्त केले त्यांनी आपल्या भाषणात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात देशभक्त क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी आपल्या जीवाची बाजी लावून परकीय जुलमी इंग्रज सत्तेविरुद्ध लढा दिला व फासावर गेले त्यांचा त्याग व बलिदानाचा विसर पडू नये असे विचार व्यक्त केले.
error: Content is protected !!