August 9, 2025

रमाई आवास योजनेतील घरकुलाचे जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांच्या हस्ते भूमिपूजन

  • पिंपळगाव (डो) – कळंब तालुक्यातील पिंपळगांव (डोळा) येथे माता रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या हस्ते करण्यात आले.
    याप्रसंगी गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी दिले.गावातील रमाई घरकुल योजनेतील उर्वरित प्रस्ताव व ओबीसी समाजाचे वंचित असलेले घरकुल योजनेचे प्रस्ताव तत्काळ द्या,या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल,असे आश्वासन सीईओ डॉ.घोष यांनी यावेळी दिले.राज्य मार्केटींग फेडरेशन मुंबई शिखर संस्थेच्या संचालकपदी आयोध्या भागवत धस यांची निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी ओम्बासे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार विजय आवधाने, गटविकास अधिकारी आर.व्ही.चकोर,भागवत धस, सरपंच संगीता स्वामी,उपसरपंच उमेश धस,विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन महादेव टेकाळे, सतीश टेकाळे,अशोक दशवंत, रामेश्वर जमाले,मंडळ अधिकारी टी. डी. मटके, तलाठी कुलकर्णी, तलाठी व्यंकटेश लोमटे, ग्रामसेवक दयानंद शिंदे,घरकुल इंजिनिअर अभिजित टेकाळे,विशाल टेकाळे,तेजस पवार यांच्यासाहित घरकुल लाभार्थींची उपस्थिती होती.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
    रोजगार सेवक सौदागर जगताप यांनी तर आभार अशोक दशवंत यांनी मानले.
error: Content is protected !!