कळंब – तालुक्यातील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीप्रिय इंग्रजी विषयाचे सहशिक्षक कमलाकर विठ्ठलराव शेवाळे यांना प्रगती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद यांनी त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार येत्या ११ फेब्रवारीला औरंगाबाद येथे वितरीत करण्यात येणार आहे .कमलाकर शेवाळे हे गेली २० वर्षे ज्ञान प्रसार विद्यालय मोहा येथे इ .५ वी ते ७ वी वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे ज्ञानदानाचे कार्य करतात.ते उपक्रमशील व नवोपक्रमशील शिक्षक म्हणून परिसरातओळखले जातात . तसेच ते लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था शेळका धानोरा व नेहरू युवा मंडळ कळंब या दोन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा सक्रीय सहभाग असतो .यामध्ये कोरोना काळामध्ये कळंब तालुक्यातील अनेक माध्यमिक प्रशालेमध्ये विद्यार्थाना ६५०० मास्कचे वाटप त्यांनी केले .तसेच वेळोवेळी रक्तदान शिबिरामध्ये अनेक वेळा रक्तदान करणे ,गरजूंना वेळोवेळी मदत करणे,वेळोवेळी वृक्षारोपण करणे,विद्यार्थांना शालेय साहीत्य वाटप करणे ,थोर समाज सुधारकांच्या जयंत्या साजरी करणे.आदीं सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग त्यांचा असतो.या त्यांच्या कार्याची दखल घेत सन 2018 – 19 मध्ये मोहेकर उद्योग समूहाचे चेअरमन हनुमंत ( तात्या )मडके यांनी त्यांना ‘गुणवंत शिक्षक ‘ पुरस्काराने ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.आशोकराव मोहेकर यांच्या हस्ते सन्मानित केले होते.अशा या उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षकांची दखल ”प्रगती सेवाभावी संस्था औरंगाबाद “यांनी देखील घेतली व त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला .त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.आशोकराव मोहेकर ,संस्थेचे अध्यक्ष अनिलजी मोहेकर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर ,प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप, प्रशालेचे पर्यवेक्षक संभाजी गिड्डे ,प्रशालेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन