धाराशिव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर धाराशिव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वार्षिक विशेष शिबिराचे मौजे खेड येथे दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी उद्घाटन झाले. सदरील कार्यक्रमास प्रमुख वक्ते प्रा. डॉ.बी.व्ही.मैंद ( धाराशिव जिल्हा समन्वयक,राष्ट्रीय सेवा योजना) तर खेड गावचे सरपंच सुनील गरड हे अध्यक्ष होते. तसेच या कार्यक्रमास डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर,धाराशिवचे संचालक प्रा.डॉ.पी.पी.दिक्षित व प्रा.जे.ए. कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. खेड गावास शासनाच्या अटल भूजल योजनेअंतर्गत रुपये 50 लाख रुपयाचे बक्षीस मिळाले. त्यानिमित्य,श्री सुनील गरड व उपस्थित गावकरी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.मैंद यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद केले.तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी शिबिर महत्वाचे असते व त्यामुळे व्यक्तिमत्व विकास होतो व शिस्त निर्माण होते.व शिस्त आयुष्य जगण्यासाठी महत्त्वाची असते, असे मार्गदर्शन याप्रसंगी डॉ. मैंद यांनी केले.अध्यक्षीय समारोपा मध्ये सरपंच सुनील गरड यांनी नमूद केले कि,सर्वांगीण विकासासाठी स्वतःच्या कोशातून बाहेर येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी लोकांशी बोलणे व त्यांच्याकडून शिकणे महत्त्वाचे आहे.तसेच घरातून बाहेर पडल्याशिवाय विकास होत नाही. अशाप्रकारचे मार्गदर्शन सरपंच सुनील गरड यांनी केले. व विद्यापीठ उपरिसराचे संचालक प्रा.डॉ.पी.पी.दीक्षित यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद केले.तसेच भारत महासत्ता बनवण्यासाठी युवकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.त्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.डॉ.एम.के.पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व कुठले उपक्रम राबविण्यात येणार या विषयी माहिती दिली. डॉ.जे.एस.शिंदे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या उद्घाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल जाधव यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. राहुल खोब्रागडे,डाॅ. मेघशाम पाटिल,डॉ.जितेंद्र शिंदे व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले