August 9, 2025

सह्याद्री पापड गृह उद्योगाचा भव्य शुभारंभ

  • मोहा – कळंब तालुक्यातील मोहा येथे एस.एम. सह्याद्री पापड व गृह उद्योगाचा शुभारंभ मंगळवार (ता.०६) रोजी मोहेकर उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मडके यांच्या हस्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
    याप्रसंगी मोहेकर उद्योग समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके, मोहेकर अँग्रो इंडस्ट्रीज चे कार्यकारी संचालक संतोष मडके, हनुमंत मते ,दिलीप झोरी, ग्रामसेवक सुदर्शन मडके,किशोर मडके, विशाल वरपे, शहाजी मोरे, मोहेकर मल्टीस्टेट मुख्य कार्यालय अधिकारी श्रीकांत मडके, प्रमोद मडके,सुरज मडके,इम्रान शेख,राहुल मडके तसेच उद्योगाचे ओनर अमोल मडके, प्रमोद मडके आदी उपस्थित होते.
    याप्रसंगी या उद्योगात पापड,शेवाई, मिरची काडप, पॅकिंचे वस्तु आदी सुरू करण्यात आले आहे, तर नियोजीत सर्व प्रकाचे मसाले तयार करण्यात येणार आहेत. तसेच पापड व शेवाई हे तयार करून पण दिलेले जानार असुन याचा मोहा व मोहा परिसरातील नागरीकांनी याचा लाभ घेण्यात यावा असे या उद्योगाचे अध्यक्ष अतुल मडके यांनी सांगितले.
error: Content is protected !!