August 9, 2025

जनकल्याण बँक कळंब या बँकेत फ्रँकिंग सेवेचा शुभारंभ

  • कळंब – सचोटी,सौजन्य, स्वाभिमान असे ब्रीद वाक्य घेवून गेल्या २८ वर्षापासून एकूण ७ शाखेसह सुरु असलेल्या जनकल्याण अर्बन को-ऑप बँक लि.कळंब.कळंब,धाराशिव,लातूर या तिन्ही शाखेचा फ्रँकिंग सेवेचा शुभारंभ मंगळवार दि. २३/०१/२०२४ रोजी गोपीनाथ कोळेकर (नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक लातूर विभाग लातूर) यांच्या हस्ते संपन्न झाला.
    बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.एम.पेकमवार यांनी प्रस्ताविक केले. यामध्ये त्यांनी बँकेचा यशाचा आलेख उपस्थित सभेसमोर मांडला.
    कोळेकर यांनी फ्रँकिंग चे महत्व विषद केले. भविष्यात शासन stamp बंद करू शकते. व केवळ फ्रँकिंग हीच सुविधा अस्तित्वात राहू शकते. असेही या प्रसंगी आपले मत व्यक्त केले. धाराशिव जिल्ह्यातील जनकल्याण बँक फ्रँकिंग सुविधा देणारी प्रथम बँक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोळेकर साहेब यांनी या उपक्रमाबद्दल बँकेचे अध्यक्ष उमेशजी कुलकर्णी व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
    उमेशजी कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना फ्रँकिंग चे महत्व उपस्थितास सांगितले. तसेच या सेवेतून बँकेस खूप मोठे उत्पन्न मिळवणे हा उद्देश नसून केवळ ग्राहकास सेवा उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले. धाराशिव जिल्ह्यातील हि सुविधा देणारी जनकल्याण बँक हि प्रथम बँक असल्याचेही त्यांनी सांगितले. संगणकीकरण (CBS), शाखा विस्तार या मध्येही धाराशिव जिल्ह्यातील प्रथम बँक असून माहे फेब्रुवारी मध्ये मोबाईल बँकिंग व UPI सुविधा सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रमास रामहरी जानकर (मुद्रांक जिल्हाधिकारी धाराशिव), दिपक देशपांडे (प्रशासकीय अधिकारी मुद्रांक विभाग लातूर), श्रीधर भवर साहेब(अध्यक्ष प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक लि. कळंब), संतोष तौर (अध्यक्ष जनहित नागरी सह. पतसंस्था, येरमाळा), हनुमंत शेळके (अध्यक्ष सुवर्ण नागरी सह. पतसंस्था लि. कळंब), उद्धव गपाट (कार्यकारी संचालक, ऋतूजाराजे महिला नागरी को-ऑप. क्रेडीट सोसायटी कळंब). हे मान्यवर उपस्थित होते.
    मान्यवराचे आभार महेश जोशी यांनी मानले.
error: Content is protected !!