धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.15 जानेवारी रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 190 कारवाया करुन 1,29,825 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
आनंदनगर पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)सुरेश माणिक पवार, वय 50 वर्षे, रा. तेर हा. मु. उपळा पाटी शिंगोली शिवार ता. जि. धाराशिव हे दि.15.01.2024 रोजी 18.25 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर उपळा पाटी जवळ शिंगोली येथे अंदाजे 1,600 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
भुम पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)सोमनाथ हरीदास खंडागळे, वय 42 वर्षे, रा. पाडोळी ता. भुम जि. धाराशिव हे दि.15.01.2024 रोजी 18.00 वा. सु. भुम ते ईट रोडलगत एम.एस.ए.बी. समोर सुकटा येथे अंदाजे 990 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ नायलान मांज्या विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हेशाखेची कारवाईै.”
कळंब पोलीस ठाणे: आरोपी नामे-राजेंद्र गणेशलाल रुणवाल, वय 57 वर्षे, रा. गणेश नगर तांदुळवाडी रोड कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे दि.15.01.2024 रोजी 20.30 वा. सु. होळकर चौक कळंब येथे महाराष्ट्र शासन निर्णय क्र सीआरटी.2015/प्र/क्र./37 ता.क्र-2 दि. 18 जुन 2016 अन्वये काढलेल्या निर्देशाचा अवज्ञा करुन इतरांचे जिवीतास सुरक्षीतता धोक्यात आणणारी कृती करुन नायलान मांजा विक्री करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी नायलान मांजाचे साहित्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि.सं. कलम 188, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 5 अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)सचिन अप्पासाहेब विधाते, 2)सागर गोरोबा उर्फ सुरेश विधाते, 3) देवराज बाबासाहेब विधाते, 4) रवि अप्पासाहेब विधाते, 5)अमोल खंडू विधाते, 6) अप्पासाहेब खंडू विधाते, 7) राहुल श्रावन विधाते, 8) अविनाश अमोल विधाते, सर्व रा. शेकापूर ता. जि. धाराशिव यांनी दि. 15.01.2024 रोजी 06.30 वा. सु. शेकापूर गावातील जिल्हापरिषद शाळे जवळ भारत विधाते यांचे किरना दुकाना समोर फिर्यादी नामे-विलास बाबु कांबळे, वय 37 वर्षे, रा. शेकापुर साठेनगर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,तलवारीने काठीने पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी यांची भावजय या भांडण सोडवण्यास आली असता त्यांनाही नमुद आरोपीने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विलास कांबळे यांनी दि.15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 307, 326, 504, 143, 147, 148, 149, 107, 354, 354(अ) भा.दं.वि.सं. सह कलम 4/25 भारतीय हत्यार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-1) मुन्ना कांबळे, 2) रोहित कांबळे, 3) संकेत कांबळे सर्व रा. शेकापूर ता. जि. धाराशिव यांनी दि.15.01.2024 रोजी दुपारी 04.00 वा. सु. जि.प.शाळेच्या समोरील रोडव्र शेकापूर येथे फिर्यादी नामे- कुमार आप्पा विधाते, वय 22 वर्षे, रा. शेकापूर ता. जि. धाराशिव हे धाराशिव येथुन गावी शेकापुर येथे आले असता नमुद आरोपींनी ‘तुला लय माज आलाय का’ थांब तुला दाखवतो असे म्हाणून फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी व त्यांचे वडील, भाउ व चुलते हे यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मरण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कुमार विधाते यांनी दि.15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 307, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-विनोद वसंत पवार, वय 30 रा. पानगाव ता. कळंब जि. धाराशिव ह.मु. पुणे यांनी दि.13.01.2024 रोजी 20.00 वा. सु. अर्जुन कोंडीराम पवार यांचे घरा समोर पानगाव येथे फिर्यादी नामे-अशोक विनायक पवार, वय 33 वर्षे, रा. पानगाव ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने गावातील शालेय शिक्षण व्यवस्थापन समीतीच्या निवडणुकीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कुमार विधाते यांनी दि.15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
आंबी पोलीस ठाणे : आरोपी मयत नामे- कृष्णा तुकाराम चव्हाण, रा. मुंगशी, ता. माढा जि. सोलापूर हे दि.13.12.2023 रोजी 20.00 वा. सु. सोनारी साखर कारखाण्याच्या जवळा मोटरसायकलवरुन ट्रॅक्टर ट्रेलर चे टायर घेवून जात होते. दरम्यान आरोपी मयत नामे-कृष्णा चव्हाण यांनी त्यांचे ताब्यातील स्पेलेंन्डर प्रो मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल ही खड्यात आदळल्याने त्यांचा तोल जावून गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे खाली पडून स्वत:चे मरणास कारणीभुत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हणुमंत शंकर लोंढे, वय 24 वर्षे, रा. मुंगशी, ता. माढा जि. सोलापूर यांनी दि.15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, ,337, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी मयत नामे-कृष्णा बाबा बनसोडे, वय 25 वर्षे, व सोबत भाउ फिर्यादी नामे- बालाजी बाबा बनसोडे, वय 21 वर्षे, रा. मुन्शी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि. 24.10.2023 रोजी 16.30 वा. सु. नारंवाडी पाटीजवळ पुलावरुन स्कुटी क्र एमएच 25 ए.व्ही. 5254 हीवरुन जात होते. दरम्यान कृष्णा बनसोडे यांनी त्यांचे ताब्यातील स्कुटी ही हायगई व निष्काळजीपणे चालवून अचानक स्कुटी स्लीप होवून रोडवर खाली पडून स्वत:चे डोक्यास गंभीर मार लागुन उपचार दरम्यान मयत झाले. व फिर्यादी नामे- बालाजी बनसोडे हेकिरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालाजी बनसोडे यांनी दि.15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, ,337, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : मयत नामे-जयश्री किरण वडलीक, वय 21 वर्षे, रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव यांनी दि.10.01.2024 रोजी सायंकाळी 08.00 ते रात्री 11.00 वा. सु. त्यांचे राहात्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- पांडुरंग भिमा वडलीक रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव हे नात्याने मयत जयश्री वडलीकयांचा सासरा असुन यातील नमुद आरोपीने मयत जयश्री वडलीक यांचे कडे वाईट नजरेने बघत होता व दारु पिवून येवून मयत यांना घाण घाण शिवीगाळ करुन शारीरीक व मानसिक त्रास दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून जयश्री वडलीक यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताची आई- अंजना मनोज साठे, वय 31 वर्षे, रा. क्रांतीनगर सरकारी दवाखान्याचे पाठीमागे अंबेजोगाई ता. अंबेजोगाई जि. बीड ह.मु. संतोष मुंढे यांचे शेतात झोला रोड गंगाखेड ता.जि. परभणी यांनी दि. 15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात