धाराशिव (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र ( District contact center – DCC ) सुरु केले आहे.आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – 2024 करिता हे संपर्क केंद्र सुरु ठेवण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहे.त्यानुषंगाने मतदारासाठी जिल्हा निवडणूक कार्यालय,धाराशिव येथे जिल्हा संपर्क केंद्र कार्यान्वीत केले आहे.जिल्हा संपर्क केंद्राचा ( District contact center – DCC ) टोल फी क्रमांक 1950 हा आहे. जिल्हयातील मतदारांनी https://electoralsearch.eci.gov.in/ या वेबसाईटवर जावून आपले नाव मतदार यादी असल्याची खात्री करावी.तसेच काही अडचणी असल्यास जिल्हा संपर्क केंद्र ( District contact center – DCC ) टोल फी क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात