August 9, 2025

बाजार समितीत सी.सी.टि.व्ही ची नजर

  • कळंब – कृषि उत्पन्न बाजार समिती,कळंबच्या कार्यक्षेत्रात सी.सी.टी.व्ही बसविणे बाबतचे आदेश मा.सभापती शिवाजी कापसे यांचे हस्ते निर्गमीत करण्यात आला.
    कृषि उत्पन्न बाजार समिती,कळंबचे संचालक मंडळ हे धाराशिव लोकसभा सदस्य खा.ओमप्रकाश राजे निंबाळकर व कळंब-धाराशिव मतदार संघाचे आ.कैलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कामकाज करत आहे. बाजार समितीवर पदभार घेवून आज ७ महिने पुर्ण होण्यापूर्वीच बाजार समितीचे विकासामध्ये अनेक मोठमोठे निर्णय घेतले आहेत.संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत शिराढोण उपबाजार विकास व मुख्य बाजार आवारात येणाऱ्या शेतकरी,व्यापारी बांधवांच्या शेतमालाची सुरक्षेसाठी तसेच अतिक्रमण धारकांवर नजर ठेवण्या करीता सी.सी.टी.व्ही बसविणे करीता ठराव पारीत करण्यात आला होता. शिराढोण येथील भुखंड लिलाव पूर्ण झाले आहेत तर गाळ्यांचे लिलाव लवकरच होतील सी.सी.टी.व्ही बाबतची निवीदा प्रक्रिया राबवून दरपत्रके मागविण्यात आले होते. सदर दरपत्रकापैकी कमी दरपत्रक असलेल्या ACHINTHYA AUTOMATION AND ROBOTICS या फर्म ला बाजार आवारातील सी.सी.टी.व्ही बसविणे बाबतचा आदेश सभापती शिवाजी कापसे यांचे हस्ते निर्गमीत करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे संचालक संदीप मडके,बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ व कर्मचारी उपस्थित होते. लवकरच बाजार समिती सी.सी.टी.व्ही च्या निगराणीत येणार असून बाजार आवारातील होणाऱ्या चोऱ्या व अवैद्य व्यवसायाला चपराक बसनार आहे असे व्यापारी वर्गांकडून बोलले जात आहे.
error: Content is protected !!