August 9, 2025

उन्मेश पाटील व अविनाश काळे यांना मूकनायक पुरस्कार तर प्रसिद्ध साहित्यिक योगीराज वाघमारे यांचा जीवनगौरव पुरस्कार

  • कळंब (माधवसिंग राजपूत) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव समिती कळंब यांच्या वतीने विचार संवर्धन महोत्सव अंतर्गत कळंब येथे पहिले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन शुक्रवार दिनांक ११ एप्रिल आणि शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी संपन्न होत आहे.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक वर्तमानपत्र सुरू केले होते हा एक व समाज परिवर्तन व प्रबोधन चळवळीतील महत्त्वाचा टप्पा आहे.मुकनायक वृत्तपत्राच्या शताब्दी निमित्त पत्रकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल कळंब येथील दैनिक लोकमतचे पत्रकार उन्मेश पाटील,उमरगा येथील दैनिक सकाळचे पत्रकार अविनाश काळे यांना मूकनायक पुरस्कार साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.संजय कांबळे यांनी जाहीर केला आहे. या पुरस्कारार्थी पत्रकारांचा गौरव संमेलन उद्घाटन सत्रात शुक्रवार ११ एप्रिल रोजी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होत आहे तर प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे सोलापूर यांचा साहित्यातील योगदानाबद्दल जीवन गौरव,सन्मानपत्र देऊन सह्दय सत्कार साहित्य संमेलन समारोप कार्यक्रम १२ एप्रिल शनिवार दुपारी ४.०० वाजता संमेलन स्थळी नगरपरिषद सांस्कृतिक भवन मेन रोड कळंब येथे संपन्न होत आहे .
error: Content is protected !!